Bigg Boss 15 मध्ये ‘बेफिक्रे’ रोमान्स; ईशान व मायशाने प्रेमात ओलांडल्या सर्व मर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 12:38 PM2021-10-10T12:38:41+5:302021-10-10T12:40:24+5:30

Bigg Boss 15: होय, काल सलमान खान म्हणाला त्याप्रमाणे, हा बिग बॉसच्या आत्तापर्यंतच्या सीझनमधील सर्वात  ‘fastest romance’ आहे. ईशान सहगल व मायशा अय्यर दोघेही एकमेकांच्या इतके प्रेमात आहेत की, आपण नॅशनल टीव्हीवर आहोत, याचाही त्यांना विसर पडलेला दिसतोय.

Bigg Boss 15: Did Ieshaan Sehgaal and Meisha Iyer smooch in one corner of the house? | Bigg Boss 15 मध्ये ‘बेफिक्रे’ रोमान्स; ईशान व मायशाने प्रेमात ओलांडल्या सर्व मर्यादा

Bigg Boss 15 मध्ये ‘बेफिक्रे’ रोमान्स; ईशान व मायशाने प्रेमात ओलांडल्या सर्व मर्यादा

googlenewsNext
ठळक मुद्दे‘द खबरी’ने दोघांचे काही रोमॅन्टिक फोटोही शेअर केले आहेत. एका फोटोत मायशा व ईशान एकच ब्लँकेट शेअर करताना दिसताहेत

बिग बॉस 15 सुरू (Bigg Boss 15) होऊन आठवडा होत नाही तोच, घरात प्रेम फुललंय. होय, काल सलमान खान (Salman Khan) म्हणाला त्याप्रमाणे, हा बिग बॉसच्या आत्तापर्यंतच्या सीझनमधील सर्वात  ‘fastest romance’आहे. बिग बॉसच्या घरातील एक जोडी प्रेमात आकंठ बुडालीय.ही जोडी म्हणजे ईशान सहगल (Ieshaan Sehgaal) व मायशा अय्यर (Meisha Iyer). दोघेही एकमेकांच्या इतके प्रेमात आहेत की, आपण नॅशनल टीव्हीवर आहोत, याचाही त्यांना विसर पडलेला दिसतोय. अगदी नॅशनल टीव्हीवर एकच ब्लँकेट शेअर करण्यापासून किस करेपर्यंतच्या सर्व मर्यादा त्यांनी ओलांडलेल्या दिसत आहेत. त्यांचा एक व्हिडीओ पाहून तर चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

मायशा व ईशान दोघांमध्येही सुरूवातीपासूनच चांगली बॉन्डिंग दिसली आणि काहीच दिवसांत ही बॉन्डिंग प्रेमात बदलली.  सध्या ईशान व मायशाचा एक व्हिडीओ व काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. व्हिडीओत दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. यात ईशान मायशाचे दोन्ही हात हातात घेऊन तिच्याशी बोलतोय. या व्हिडीओत दोघांची रोमॅन्टिक केमिस्ट्री दिसतेय. 

‘द खबरी’ने दोघांचे काही रोमॅन्टिक फोटोही शेअर केले आहेत. एका फोटोत मायशा व ईशान एकच ब्लँकेट शेअर करताना दिसताहेत. एका फोटोत ईशान मायशाच्या मांडीवर डोकं ठेवून पहुडलेला दिसतोय. सोशल मीडियावर दोघांना आणखीही एक व्हिडीओ व्हायरल होतोय. तो पाहून नेटक-यांनी मायशा व ईशानने एकमेकांना किस केल्याचा दावा केला आहे.

एकाच ब्लँकेटमध्ये दोघांनीही रोमॅन्टिक गोष्टी शेअर केल्यात. याचीही सध्या जोरदार चर्चा आहे. तुला कशी मुलगी आवडते? असे मायशा ईशानला विचारते. यावर ती खूप सुंदर, प्रेमळ असावी. तिने माझ्यावर बिनशर्त प्रेम करावं, इतकीच माझी अपेक्षा आहे, असं ईशान म्हणतो. यानंतर तुला कसा मुलगा आवडेल? असा प्रश्न ईशान मायशाला करतो. यावर मला खूप आॅफबीट मुलं आवडतात. नाहीतर माझे नखरे कोण झेलणार? असं ती म्हणते. यावर मी तर गेल्या पाच दिवसांपासून तुझे नखरे झेलतोय. माहित नाही का, पण त्या दिवशी तू रडलीस आणि मी खरंच तुझ्या प्रेमात पडलो, असं ईशान म्हणतो. यावर मायशा हैराण होते.  

Web Title: Bigg Boss 15: Did Ieshaan Sehgaal and Meisha Iyer smooch in one corner of the house?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.