bigg boss 15 : तो फालतू माणूस माझ्या पोरीकडं किस मागतो..; देवोलिनाची आई अभिजीत बिचुकलेवर संतापली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 10:26 IST2021-12-21T10:24:00+5:302021-12-21T10:26:33+5:30

Bigg Boss 15 : होय, लेकीला किस मागणा-या बिचुकलेवर देवोलिनाची आई चांगलीच संतापली आहे.

bigg boss 15 devoleena bhattacharjee mother got angry on abhijeet bichukale-for-demand-kiss-from-actress | bigg boss 15 : तो फालतू माणूस माझ्या पोरीकडं किस मागतो..; देवोलिनाची आई अभिजीत बिचुकलेवर संतापली

bigg boss 15 : तो फालतू माणूस माझ्या पोरीकडं किस मागतो..; देवोलिनाची आई अभिजीत बिचुकलेवर संतापली

 Bigg Boss 15 : घसरलेला टीआरपी वाढवण्यासाठी ‘बिग बॉस 15’च्या घरात अनेक स्पर्धकांना    वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली. पण हे स्पर्धक घरात आलेत आणि घरातले राडे आणखीच वाढले. गेल्या आठवड्यात तर ‘बिग बॉस 15’च्या घरात अभिजीत बिचुकलेने (Abhijeet Bichukale) नुसता धुमाकूळ घातला. एका टास्कदरम्यान त्याने चक्क देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) हिच्याकडे किसची मागणी केली. इतकंच नाही सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडून त्याने देवोलिनाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्नही केला. यानंतर घरातलं वातावरण चांगलंच तापलं होतं. आता या मुद्दयावरून घराबाहेरचं वातावरणही तापलं आहे. होय, आता देवोलिनाच्या आईने यावर प्रतिक्रिया दिली आहे. लेकीला किस मागणा-या बिचुकलेवर देवोलिनाची आई चांगलीच संतापली आहे.

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, देवोलिनाच्या आईने बिचुकलेला चांगलंच फटकारलं. बिचुकले हा फालतु माणूस आहे. मी सगळं टीव्हीवर पाहिलं तेव्हा मला प्रचंड राग आला होता. आधी बिचुकले मस्करी करतोय, असं मला वाटलं होतं. पण त्याने पुन्हा पुन्हा किसची मागणी केली. देवोलिनाने यावर लगेच रिअ‍ॅक्ट व्हायला हवं होतं, असं सलमान म्हणाला. पण माझ्यामते, देवोलिनाला देखील तो मस्करी करतोय, असंच वाटलं असावं. पण तो मस्करीत बोलत नाहीये, हे कळल्यावर तिने त्याला जोरदार उत्तर दिलं. बिचुकले शोमध्ये आला तेव्हापासूनच तो मला जराही आवडला नव्हता. त्यानं जे काही केलं, त्याचं मुळीच समर्थन करता येणार नाही, अशा शब्दांत देवोलिनाच्या आईने तिचा संताप व्यक्त केला.

देवोलिना व रश्मी देसाई या दोघींच्या वादावरही देवोलिनाच्या आईने प्रतिक्रिया दिली. रश्मी स्वार्थी आहे, असं ती म्हणाली.

काय आहे प्रकरण
गेल्या आठवड्यात घरातील सदस्यांना बिग बॉसने म्युझियममधील वस्तू चोरण्याचा टास्क दिला होता. यादरम्यान बिचुकले ब-याच वस्तू चोरल्या होत्या. माझ्याकडे खूप वस्तू आहेत, असे तो देवोलिनाला सांगतो. तो इथेच थांबत नाही तर देवोलिनाच्या गालांना स्पर्श करत ‘तेरे लिए कुछ भी करूंगा लेकिन पप्पी चाहिए,’ असं म्हणतो. त्याचं ते वाक्य ऐकून देवोलिना त्याच्यावर चांगलीच बरसते.  माझ्या चांगलुपणाचा फायदा उचलू नकोस, सीमा लांघू नकोस, अशा शब्दांत ती अभिजीतला समज देते. यावर मी मस्करी करत होतो, असं म्हणत बिचुकले सारवासारव करतो. 
  

Web Title: bigg boss 15 devoleena bhattacharjee mother got angry on abhijeet bichukale-for-demand-kiss-from-actress