Bigg Boss 15: अभिजीत बिचुकलेनं ओलांडल्या सर्व मर्यादा, देवोलिनाला ‘KISS’साठी केलं ब्लॅकमेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 11:50 IST2021-12-15T11:49:31+5:302021-12-15T11:50:10+5:30

Bigg Boss 15: होय, अभिजीत बिचुकलेने चक्क देवोलिना भट्टाचार्जी हिला किस मागितला आणि राडा झाला. याचा एक प्रोमो सध्या व्हायरल होतोय.

bigg boss 15 abhijeet bichukale blackmailed devoleena bhattacharjee and ask for kiss | Bigg Boss 15: अभिजीत बिचुकलेनं ओलांडल्या सर्व मर्यादा, देवोलिनाला ‘KISS’साठी केलं ब्लॅकमेल

Bigg Boss 15: अभिजीत बिचुकलेनं ओलांडल्या सर्व मर्यादा, देवोलिनाला ‘KISS’साठी केलं ब्लॅकमेल

Bigg Boss 15:  ‘बिग बॉस 15’ हा टीव्ही शो आता अंतिम टप्प्यात आहे. साहजिकच ‘टिकट टू फिनाले’ जिंकण्यासाठी सर्व स्पर्धक जीवाचं रान करत आहेत. फिनाने जवळ येतोय, तसे बिग बॉसच्या घरातील वादही वाढू लागले आहेत. रोज नवे राडे, रोज नवे वाद सुरू आहेत. अशात एका टास्कदरम्यान अभिजीत बिचुकलेने (Abhijeet Bichukale) सर्व मर्यादा लांघताना दिसला आणि घरात जोरदार राडा झाला.

होय, अभिजीत बिचुकलेने चक्क देवोलिना भट्टाचार्जी  (Devoleena Bhattacharjee) हिला किस मागितला आणि राडा झाला. याचा एक प्रोमो सध्या व्हायरल होतोय.

घरातील सदस्यांना बिग बॉसने म्युझियममधील वस्तू चोरण्याचा टास्क दिला होता. यादरम्यान बिचुकले ब-याच वस्तू चोरतो. माझ्याकडे खूप वस्तू आहेत, असे तो देवोलिनाला सांगतो. तो इथेच थांबत नाही तर देवोलिनाच्या गालांना स्पर्श करत, ‘तेरे लिए कुछ भी करूंगा लेकिन पप्पी चाहिए,’ असं म्हणतो. त्याचं ते वाक्य ऐकून देवोलिना त्याच्यावर चांगलीच बरसते.  माझ्या चांगलुपणाचा फायदा उचलू नकोस, सीमा लांघू नकोस, अशा शब्दांत ती अभिजीतला समज देते. यावर मी मस्करी करत होतो, असं म्हणत बिचुकले सावरासावर करताना दिसतो.

यादरम्यान तेजस्वी प्रकाश आणि प्रतीक सहजपाल देवोलिनाच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरतात. अभिजीत बिचुकले तुला ब्लॅकमेल करत होता का? असा प्रश्न तेजस्वी विचारते. यावर देवोलिना ‘हो’ असं उत्तर देते आणि तिचं ते उत्तर ऐकून तेजस्वीचा पारा चढतो. मग तेजस्वी व अभिजीत यांच्यात जोरदार वाद होतो. देवोलिना स्वत:चे अश्रू रोखू शकत नाही.

अभिजीत बिचुकलेने ‘बिग बॉस मराठी’त अक्षरश: धुमाकूळ घातला होता. बिग बॉस 15 मध्येही बिचुकलेचा अनेकदा स्वत:वरचा ताबा सुटला. अलीकडे एका टास्कमध्ये तो अगदी बिग बॉसचे घर जाळण्याचीच धमकी देताना दिसला होता. यामुळे राखी सावंत प्रचंड टेन्शनमध्ये आली होती. आता या कृत्यासाठी येत्या ‘वीकेंड का वार’मध्ये बिचुकलेला काय ऐकावं लागतं, ते बघूच.

Web Title: bigg boss 15 abhijeet bichukale blackmailed devoleena bhattacharjee and ask for kiss