बिग बॉस 14: सलमानच्या तुरुंगात ‘कैद’ होण्यापूर्वी कॅरी मिनाटी झाला क्वारंटाईन!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 11:40 IST2020-09-16T11:38:16+5:302020-09-16T11:40:52+5:30
जाणून घ्या बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणारा कॅरी मिनाटी आहे तरी कोण?

बिग बॉस 14: सलमानच्या तुरुंगात ‘कैद’ होण्यापूर्वी कॅरी मिनाटी झाला क्वारंटाईन!!
टीव्हीवरचा सर्वाधिक वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिस बॉस’चे 14 वे सीझन येत्या 3 तारखेपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बिग बॉस प्रीमिअरची तारीख समोर येताच, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बिग बॉसच्या घरात यंदा कोण कोण जाणार, हे जाणून घेण्याची उत्सुकताही वाढली आहे. तूर्तास चाहत्यांची उत्सुकता वाढवणारी एक खास बातमी आहे. होय, यावेळी लोकप्रिय युट्यूबर कॅरी मिनाटी सलमान खानच्या या शोमध्ये जाणार असल्याचे कळतेय. मिनाटीच नाही तर त्याच्याशिवाय 3 अन्य युट्यूबर्सही बिग बॉसच्या घरात धमाकेदार एन्ट्री घेणार आहेत.
कॅरी मिनाटी आयसोलेशनमध्ये
बिग बॉसच्या घरात जाणा-या सर्व 14 स्पर्धकांना शो सुरू होण्यापूर्वी एका हॉटेलात 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. सूत्रांचे मानाल तर कॅरी मिनाटी हा सुद्धा मुंबईच्या एका हॉटेलात सर्व सदस्यांसोबत क्वारंटाईन झाला आहे. हा क्वारंटाईन काळ पूर्ण केल्यानंतरच कॅरी व अन्य स्पर्धक बिग बॉसच्या घरात जाऊ शकणार आहेत. कॅरी मिनाटी आता शूटींगच्या दिवशीच हॉटेलबाहेर येईल. आयसोलेशन पूर्ण झाल्यानंतर सर्व सदस्यांची मेडिकल टेस्टही केली जाणार आहे. जेणेकरून बिग बॉसच्या घरात कोरोना व्हायरसच्या एन्ट्रीची शक्यता पूर्णपणे संपुष्टात येईल.
बिग बॉस 14 चे शूटींग 1 ऑक्टोबरपासून गोरेगाव फिल्म सिटीत शूटींग सुरु होणार आहे.
माहित नसेल तर माहित करून घ्या कोण आहे कॅरी मिनाटी
काही दिवसांपूर्वी कॅरी मिनाटी हे नाव अचानक चर्चेत आले होते. सोशल मीडियावर युट्यूब विरूद्ध टिक टॉक असे ‘वॉर’ छेडले होते. यानंतर कॅरी मिनाटी हे नाव तर जबरदस्त ट्रेंडमध्ये आहे होते. कॅरीने एक व्हिडीओ शेअर केला आणि सोशल मीडियाव टिक टॉक विरूद्ध युट्यूब हे युद्ध रंगले होते. पाठोपाठ या युद्धावरच्या भन्नाट मीम्सचा जणू पूर आला होता.
या युद्धाला तोंड फोडणारा कॅरी कोण हे जरा जाणून घेऊ या...
तसे नव्या पिढीला कॅरी मिनाटी हे नाव नवे नाही. तो युट्यूबचा सर्वाधिक लोकप्रिय स्टार आहे. त्याचे खरे नाव अजय नागर. कॉमेडियन, रॅपर आणि आता युट्यूब स्टार अशी त्याची ओळख आहे. फरीदाबादचा या अजयचे युट्यूबवर CarryMinati आणि CarryIsLive अशी दोन चॅनल्स आहेत.
युट्यूब करिअरसाठी कॅरीने मध्येच शिक्षण सोडले. होय, अगदी 12 वी परीक्षा न देण्याचा निर्णय त्याने घेतला. अर्थात पुढे त्याने हे शिक्षण पूर्ण केले, हा भाग वेगळा.
अजय नागर कॅरी मिनाटी नावाने युट्यूबवर लोकप्रिय आहे. युट्यूबवर लोकांची खिल्ली उडवणारे व्हिडीओ शेअर करणे शिवाय लाईव्ह गेमिंगसाठी तो ओळखला जातो.
युट्यूबसाठी कॅरीने सोडली होती 12ची परीक्षा, Carryबाबत माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घ्या
YouTube Vs TikTok Roast ! सोशल मिडीयावर कॅरी मिनाटी आणि आमिर सिद्दीकीचं WAR!!
वयाच्या 10 व्या वषार्पासून कॅरीने युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करणे सुरु केले होते. अगदी सुरुवातीला सनी देओलची मिमिक्री करणारा व्हिडीओ त्याने पोस्ट केला होता. 2014 मध्ये त्याने कॅरीमिनिटी हे मूळ युट्यूब चॅनल सुरु केले. 2017 मध्ये CarryIsLive आणखी एक युट्यूब चॅनल उघडले.
कॅरीने जानेवारी 2019 मध्ये युट्यूबपर Pewdiepie विरोधात Bye Pewdiepie नावाने एक डिस गाणे साद केले होते. ते प्रचंड लोकप्रिय झाले होते. 24 तासांत या गाण्याला 5 मिलियन व्ह्युज मिळाले होते. 2019 या सालात टाईम मॅगझिनद्वारा नेक्स्ट जनरेशन लीडर्स 2019 व्या यादीत कॅरी दहाव्या क्रमांकावर होता. इनोव्हेटिव्ह करिअर करणा-या युवांची ही यादी टाईम मॅगझिन दरवर्षी प्रसिद्ध करते.
पाहु या कॅरीचे काही लोकप्रिय व्हिडीओ