तर आम्ही शिवसेनेची मदत घेऊ...! शहनाज गिलचे वडील भडकले!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 16:32 IST2020-02-16T16:31:54+5:302020-02-16T16:32:48+5:30
फिनाले संपून काही तास होत नाहीत तोच या ‘बिग बॉस 13’शी संबंधित एक नवा वाद समोर आला आहे.

तर आम्ही शिवसेनेची मदत घेऊ...! शहनाज गिलचे वडील भडकले!!
फिनाले संपून काही तास होत नाहीत तोच या ‘बिग बॉस 13’शी संबंधित एक नवा वाद समोर आला आहे. होय, ‘बिग बॉस 13’ फिनालेआधी या शोमधील स्पर्धक शहनाज गिलचे स्वयंवर होणार, अशी घोषणा करण्यात आली होती. बिग बॉसच्या घरातच ही घोषणा झाल्याने शहनाजच्या स्वयंवर कसे होणार, शहनाज कुणाच्या गळ्यात माळ घालणार, याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. पण आता चाहत्यांची निराशा होण्याची चिन्हे आहेत. होय, शहनाजचे वडील संतोष सिंग गिल यांनी लेकीच्या या स्वयंवराला कडाडून विरोध केला आहे. केवळ इतकेच नाही तर शिवसेनेची मदत घेण्याचेही म्हटले आहे.
पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, शहनाजच्या स्वयंवरास संतोष यांचा तीव्र विरोध आहे. या प्रकरणी त्यांनी संबंधित चॅनलवर कडाडून हल्ला केला आहे. ‘माझ्या मुलीला पंजाबची कतरीना कैफ म्हणून ओळखले जाते. पण चॅनल तिला राखी सावंत बनवण्याचे प्रयत्न करतेय. चॅनलने हे प्रयत्न थांबवले नाहीत तर प्रसंगी मी शिवसेनेची मदत घेईल,’ असे संतोष म्हणाले.
शहनाजच्या शोचे नाव ‘मुझसे शादी करोगे?’ आहे. उद्या 17 तारखेपासून हा शो सुरु होतोय. या शोची घोषणा होताच शहनाजचे चाहते नाराज झाले होते. इतके की, सोशल मीडियावर ‘बायकॉट शहनाज की शादी’ नावाचा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. हा रिअॅलिटी शो शहनाजचे करिअर उद्धवस्त करेल, असे चाहत्यांचे मत होते. आता इतक्या विरोधानंतरही शहनाज हा शो करते की नाही, ते उद्या कळेलच.