Bigg Boss 13 : रश्मीने सिद्धार्थवर केला खळबळजनक आरोप, सलमानही हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 13:39 IST2019-12-22T13:38:34+5:302019-12-22T13:39:21+5:30
‘बिग बॉस 13’मध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांच्यातील वाद विकोपाला पोहोचला आहे.

Bigg Boss 13 : रश्मीने सिद्धार्थवर केला खळबळजनक आरोप, सलमानही हैराण
‘बिग बॉस 13’मध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांच्यातील वाद विकोपाला पोहोचला आहे. होय, गेल्या एपिसोडमध्ये दोघांचाही वाइ इतका विकोपाला गेला की, संतापाच्या भरात रश्मीने सिद्धार्थवर चहा फेकला. यानंतर सिद्धार्थही भडकला. त्यानेही आपल्या कपातील चहा रश्मीच्या अंगावर फेकला. अरहान दोघांचे भांडण सोडवायला गेला तर त्याच्यात आणि सिद्धार्थमध्येच जुंपली. आता बिग बॉसच्या घरातील रश्मी व सिद्धार्थच्या भांडणाचा एक नवा व्हिडीओ व्हायरल होतोय.
होय, या व्हिडीओत रश्मी देसाइने सिद्धार्थवर ड्रग्स घेत असल्याचा आरोप करताना दिसतेय. वीकेंडच्या वॉरमधील या व्हिडीओत रश्मी रागारागात सिद्धार्थवर ड्रग्स घेत असल्याचा आरोप करते. तिचा तो आरोप ऐकून सलमान सुद्धा हैराण होतो.
हे भांडण सलमान खान स्क्रीनवर बघत आहे. आज प्रसारित होणा-या एपिसोडमध्ये सलमान या सर्वांना कसे सुनावतो आणि कोणाला काय शिक्षा देतो हे पाहायला मिळाणार आहे.
दुस-या आठवड्यात रश्मी आणि सिद्धार्थ शुक्ला एकमेकांचे चांगले फ्रेंड्स झाल्याचे पहायला मिळाले होते. पण नंतर लगेचच या दोघांमध्ये वाद पहायला मिळाला होता. पहिल्या आठवड्यात रश्मी देसाई व सिद्धार्थ शुक्ला बेड शेअर करत असल्याचे पाहायला मिळाले होते. बेड शेअरिंगनंतर पहिल्या तीनच दिवसांत रश्मी व सिद्धार्थमधील जवळीक वाढू लागली होती. मात्र अचानक या दोघांचे बिनसले आणि आता तर त्यांच्यातील भांडण विकोपाला गेले आहे. हे भांडण कुठल्या स्तराला जाते, ते आपण बघूच.