ही अभिनेत्री बिग बॉसच्या घरात पडली प्रेमात, आता रचणार स्वयंवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 02:30 PM2020-02-02T14:30:00+5:302020-02-02T14:30:01+5:30

हजारोंमधून निवडणार भावी पती...

bigg boss 13 a new reality show offered to shehnaz gill | ही अभिनेत्री बिग बॉसच्या घरात पडली प्रेमात, आता रचणार स्वयंवर

ही अभिनेत्री बिग बॉसच्या घरात पडली प्रेमात, आता रचणार स्वयंवर

googlenewsNext
ठळक मुद्देसलमान खान याने शहनाजला  पंजाबची कतरिना कैफ हे नाव दिले आहे.

बिग बॉस 13 चा विनर कोण होणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. यंदाचे ‘बिग बॉस’ हे सीझन कधी नव्हे इतके हिट ठरले आहे. साहजिकच ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांचे नशीबही फळफळले आहे. होय, सिद्धार्थ शुक्लासोबतच्या वाढत्या जवळीकीमुळे चर्चेत असलेली शहनाज गिल हिला एक नवा शो आॅफर झाल्याचे कळतेय.  यात शहनाज स्वयंवर रचताना दिसणार आहे. होय, ‘शहनाज गिल की शादी’ असे या शोचे नाव असणार असल्याचे समजतेय.
टेली चक्कर या वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. ‘राखी का स्वयंवर’ याच धर्तीवर कलर्स वाहिनी हा नवा रिअ‍ॅलिटी शो घेऊन येतेय. यात शहनाज  हजारो स्पर्धकातून तिचा भावी पती निवडणार आहे.

‘राखी का स्वयंवर’नंतरया रिअ‍ॅलिटी शोचे दोन सीझन आले होते. पहिल्या सीझनमध्ये राखी सावंतचे स्वयंवर रचले गेले होते. तर दुस-या सीझनमध्ये राहुल महाजनचे स्वयंवर पार पडले होते. तिसºया सीझनमध्ये रतन राजपूत स्वयंवर रचताना दिसली होती. या रिअ‍ॅलिटी शोने खास टीआरपी मिळवला होता.


  
शहनाज गिल ही गेल्या चार महिन्यांपासून बिग बॉसच्या घरात आहे. या चार महिन्यांच्या काळात शहनाज चांगलीच लोकप्रिय झाली. सिद्धार्थ शुक्ला आणि तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना इतकी आवडली की,अगदी काही दिवसांत शहनाजची फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणात वाढली.

सलमान खान याने शहनाजला  पंजाबची कतरिना कैफ हे नाव दिले आहे. खरे तर शहनाजच्या मनात सिद्धार्थ बसला आहे. स्वत: शहनाजनेही याची कबुली दिली आहे. पण आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर शहनाज नवरा मुलगा शोधणार आहे. आता तिला कोण पसंत पडतो, ते बघूच.

Web Title: bigg boss 13 a new reality show offered to shehnaz gill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.