Bigg Boss 13 : खुल्लमखुल्ला सर्वांसमोर हिमांशी खुराणा असीम रियाजकडे व्यक्त करणार प्रेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 13:27 IST2020-01-28T13:27:08+5:302020-01-28T13:27:50+5:30
Bigg Boss 13 : बिग बॉसच्या घरात सगळ्यांच्या समोर हिमांशी असीमकडे प्रेम व्यक्त करणार आहे.

Bigg Boss 13 : खुल्लमखुल्ला सर्वांसमोर हिमांशी खुराणा असीम रियाजकडे व्यक्त करणार प्रेम
बिग बॉस १३ मध्ये असं काही होणार आहे जे आतापर्यंत कधी पाहिलेलं नाही. यावेळी निर्मात्यांनी हा शो आणखीन इंटरेस्टिंग बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी भागात बिग बॉसचे निर्माते कंटेस्टंटच्या घरातल्यांची ग्रॅण्ड एन्ट्री घरात करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, घरात सिद्धार्थ शुक्लापासून असीम रियाज यांच्यापर्यंत सर्व स्पर्धकांच्या घरातले बिग बॉसच्या घरात पहायला मिळणार आहेत आणि आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी खेळाच्या माध्यमातून एकमेकांशी सामना करणार आहेत.
या यादीत असीम रियाजचं मन जिंकणारी पंजाबची ऐश्वर्या राय म्हणजेच हिमांशी खुराणाचा देखील समावेश आहे. हिमांशी घरात जाऊन असीम रियाजला सपोर्ट करणार आहे. हे माहित झाल्यावर असीम रियाजचे चाहते आनंदाने खुश होणार आहेत.
घरात येऊन हिमांशी खुराणा असीम रियाजला मागील दिवसांमधील गोष्टी सांगणार आहे. तसेतर सोशल मीडियावर हिमांशीने तिच्या बाजूने असीम रियाजला कुछ कुछ होता हैचा इशारा दिला आहे. मात्र आता कदाचित ती शोमध्ये असीमच्या समोरच ही कबुली देईल.
बिग बॉसच्या आगामी भागात हिमांशी खुराणासोबत शहनाज गिलचा भाऊ शहबाजदेखील एन्ट्री करणार आहे. याशिवाय सिद्धार्थ शुक्लाची बहिण, आरती सिंगची वहिनी कश्मीरा शाह, माहिरा शर्माचा भाऊ आकाश घरात एन्ट्री करणार आहेत.
इतकंच नाही तर सगळेच घरात ४ दिवस वास्तव्यास राहणार आहेत.
बिग बॉसचे निर्माते घरात स्पर्धकांना एक गेम खेळायला लावणार आहेत.