Bigg Boss 13 Day 12 : घरात निर्माण होत आहेत नवीन नाती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 18:41 IST2019-10-11T18:39:16+5:302019-10-11T18:41:45+5:30
आता पुढे काय काय करायचे याविषयी स्पर्धक प्लान रचत असून घरात नवीन नाती निर्माण होत आहेत.

Bigg Boss 13 Day 12 : घरात निर्माण होत आहेत नवीन नाती
काल मुलांसाठी बिग बॉसच्या घरात रिपोर्ट कार्ड सेशन झाले होते. पण त्याचा नाट्यमयरित्या शेवट झाल्यानंतर आज देखा जो तुझे यार दिल में बजी गितार हे गाण्यावर ताल धरत स्पर्धकांचा बिग बॉसमधील पुढचा दिवस सुरू झाला. आता पुढे काय काय करायचे याविषयी स्पर्धक प्लान रचत असून घरात नवीन नाती निर्माण होत आहेत. काही नवीन ग्रुप घरात तयार होत आहेत तर काही एकमेकांच्या दुःखात त्यांना सांभाळून घेताना दिसत आहेत. आता या घरात नवीन ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळणार यात काहीच शंका नाही.
बिग बॉसचे घर आता दोन ग्रुपमध्ये विभागले गेले आहे. एका ग्रुपमध्ये सिद्धार्थ शुक्ला, शेहनाझ, असीम, आरती, अबुजी आणि देवोलिना आहेत तर दुसऱ्या ग्रपमध्ये पारस, माहिरा, रश्मी, शेफाली, सिद्धार्थ जे आणि कोएना आहेत. दोन्ही ग्रुपमधील मंडळी बिग बॉसचा गेम कसा खेळायचा याचा प्लान रचत आहेत त्याचसोबत प्रत्येक स्पर्धक आपला स्वतःचा वेगळा प्लान देखील आखत आहे. पारस असीमसोबत बोलताना दिसत आहे की, तू ज्या ग्रुपमध्ये आहे त्याचा नकारात्मक परिणाम तुझ्यावर होणार आहे तर त्यानंतर तो शेहनाझसोबत असलेले काही गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण पारसच्या बोलण्याचा या दोघांवरही काहीही परिणाम झालेला नसून आपण आपल्याच पद्धतीने घरात राहायचे असे ते ठरवताना दिसत आहे.
बिग बॉसच्या घरात संध्याकाळी स्पर्धकांना नवीन टास्क देण्यात येणार आहे. यात एका मुलाला घरातून बाद होण्यापासून आपली सुटका करता येईल असे सांगण्यात येते. घरातून बाहेर जाण्यासाठी नामांकन मिळालेल्या स्पर्धकांना सांगण्यात येते की, तुम्ही तुमच्याकडे असलेले मासे दुसऱ्याच्या तलावात टाकून स्वतःचे तलाव स्वच्छ करून घ्यायचे आहे. पण या सगळ्यात ट्विस्ट म्हणजे मुलींना देखील याची संधी देण्यात आली आहे. मुलींना एका भांड्यात मासे देण्यात आले, जे त्यांना मुलांच्या तलावात टाकायचे आहेत. क्विन असलेल्या मुलीला एकावेळी दोन भांड्यात मासे देण्यात आले. पण हा टास्क सुरू झाल्यानंतर एक वेगळेच युद्ध सुरू झाले. एकमेकांचे चांगले फ्रेंड्स असलेले लोक देखील या टास्कमुळे एकमेकांचे वैरी झाले. शहनाझ आणि पारस यांच्यात या टास्कमुळे देखील वाद झाला. पारस दलजीतला पाठिंबा देत असल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला. त्यावर पारसमुळे दलजीतच्या निर्णयावर कोणता परिणाम झाला नसल्याचे तिने सांगितले. पण ती शहनाझचे भांडे तोडू शकते हे पारसला माहीत असल्याची तिने कबुली दिली. आता कोणत्या मुलाला या घरातून बाहेर न जाण्याची संधी मिळते हे प्रेक्षकांना उद्याच्याच भागात पाहायला मिळणार आहे.