बिग बॉस 13च्या या स्पर्धकाला जीवे मारण्याची दिली धमकी, घेतली पोलिसांकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 10:56 IST2020-04-22T10:55:56+5:302020-04-22T10:56:37+5:30

बिग बॉस 13 च्या या स्पर्धकाला तुझा मृतदेह कधीच मिळणार नाही, अशी धमकी सोशल मीडियावर देण्यात आली आहे.

The Bigg Boss 13 contestant was threatened with death and rushed to the police TJL | बिग बॉस 13च्या या स्पर्धकाला जीवे मारण्याची दिली धमकी, घेतली पोलिसांकडे धाव

बिग बॉस 13च्या या स्पर्धकाला जीवे मारण्याची दिली धमकी, घेतली पोलिसांकडे धाव

गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस 13चे स्पर्धक चर्चेत येत आहेत. स्पर्धक रश्मी देसाई आणि बिग बॉस 13 चा एक्स स्पर्धक अरहान खान चर्चेत आल्यानंतर आता देवोलिना चर्चेत आली आहे. अरहान खानच्या चाहतीने देवोलिना भट्टाचार्यला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यासोबतच त्या व्यक्तीने सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांनाही धमकी दिली आहे. देवोलिनाने मुंबई पोलिसांना टॅग करत त्यांना कारवाई करण्यास सांगितले आहे.

देवोलिना भट्टाचार्यने ट्विट केले की, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सायबर सेल प्लीज हे मेसेज पहा. ज्यात मला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. तुम्हाला विनंती आहे. लवकरात लवकर यावर अ‍ॅक्शन घ्या.


यासोबत देवोलिनाने एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. यात एका महिलेने देवोलिनासाठी लिहिले आहे की, तू वारंवार अरहानचा अपमान करत आहेस. ज्याच्या मदतीने तू हे करत आहेस त्यांचा आणि तुझा मृतदेह कधीच मिळणार नाही. मी रश्मी आणि सिद्धार्थबद्दल बोलत आहे. जर तू अरहानबद्दल एकदा जरी अपशब्द वापरला तर तुझा तो शेवटचा दिवस असेल.


देवोलिना रश्मी देसाईची चांगली मैत्रीण असून ती तिला सपोर्ट करत असल्यानेच ती अरहानच्या चाहतीच्या टारगेटवर आली आहे. बिग बॉसमध्येही देवोलिना अरहानच्या विरोधात दिसली आहे.

Web Title: The Bigg Boss 13 contestant was threatened with death and rushed to the police TJL