बिपाशाचा पती करण सिंग गोव्हरला आरती बोलते जिगर का तुकडा, वाचा काय आहे ही भानगड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 16:31 IST2019-11-13T16:26:51+5:302019-11-13T16:31:08+5:30
बिग बॉसच्या घरात आरतीने तिच्या आयुष्यातील एका खास व्यक्तिविषयी म्हणजेच करणविषयी सगळ्यांना सांगितले आहे.

बिपाशाचा पती करण सिंग गोव्हरला आरती बोलते जिगर का तुकडा, वाचा काय आहे ही भानगड
बिग बॉसच्या तेराव्या सीझनमध्ये गोविंदाची भाची आरती सिंग हिचा प्रवास चाहत्यांना भावतो आहे. आरती सिंगचं नाव बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी सिद्धार्थ शुक्लासोबतच्या अफेयरमुळे चर्चेत आले होते. पण काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात आरतीने सिद्धार्थ सोबतच्या नात्याबद्दल भाष्य केलं होतं. ती पुढील वर्षी लग्न करणार असल्याचंही तिने या कार्यक्रमात सांगितले होते. आता तिने बिग बॉसच्या घरात तिच्या आयुष्यातील एका खास व्यक्तिविषयी सांगितले आहे. एवढेच नव्हे तर या खास व्यक्तीची एक वस्तूदेखील ती या घरात घेऊन आली आहे.
आरतीच्या आयुष्यातील हा खास व्यक्ती दुसरा कोणीही नसून बिपाशा बासूचा नवरा करण सिंग ग्रोव्हर आहे. करण आरतीचा खूप चांगला फ्रेंड असून त्याच्याविषयी काही खास गोष्टी तिने या कार्यक्रमात सांगितल्या आहेत. बिग बॉसच्या अनसीन फुटेजमध्ये आरती सिंग करण सिंग तिच्यासाठी किती स्पेशल आहे हे बोलताना दिसत आहे. या घरात नुकतीच वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे तहसीन पुनावालाची एंट्री झाली आहे. तहसीनला करणबाबत ती सांगत आहे की, मी आजवर जितक्या लोकांना भेटले आहे, त्यात करण सिंग ग्रोव्हर सगळ्यात चांगली व्यक्ती आहे. करण हा खूप चांगला मुलगा असून मी माझ्या मोबाईलमध्ये त्याचे नाव जिगर का तुकडा असे सेव्ह केले आहे. त्यामुळे त्याचा फोन येतो, त्यावेळी माझ्या मोबाईच्या स्क्रीनवर जिगर का तुकडा कॉलिंग असे येते.
पुढे ती सांगते, करणचे एक जॅकेट मी माझ्यासोबत घेऊन आले आहे. मला त्याने सांगितले आहे की, या कार्यक्रमात तू कधीही कोणत्या चिंतेत असशील तर हे जॅकेट घाल... मी तुझ्यासोबतच आहे असे तुला वाटेल... मला त्याची प्रचंड आठवण येतेय.
आरतीचा हा व्हिडिओ करणने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर शेअर केला असून आरतीला जास्तीत जास्त लोकांनी वोट द्यावे यासाठी त्याने लोकांना आवाहन केले आहे.