बहिणीच्या लग्नाआधी दुर्दैवी घटना, रोकड आणि दागिने घेऊन चोर फरार, अभिनेत्रीचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 14:31 IST2025-05-26T14:26:02+5:302025-05-26T14:31:13+5:30
बिग बॉस फेम अभिनेत्रीच्या घरी मोठी चोरी झाली असून बहिणीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने अभिनेत्रीने संताप व्यक्त केलाय

बहिणीच्या लग्नाआधी दुर्दैवी घटना, रोकड आणि दागिने घेऊन चोर फरार, अभिनेत्रीचा मोठा खुलासा
'बिग बॉस ११' मधून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री बंदगी कालराच्या (bandagi kalra) घरात नुकतीच चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती तिने स्वतः इंस्टाग्राम स्टोरीद्वारे दिली आहे. बंदगीच्या घराचे दोन्ही दरवाजे तुटलेले होते आणि मोठ्या प्रमाणात रोकड तसेच मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत. बहिणीच्या लग्नाच्या आधी ही घटना घडल्याने बंदगीच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. तिच्या घरात मोठ्या प्रमाणात रोकड आणि दागिने ठेवण्यात आले होते, जे चोरीला गेले आहेत.
बंदगी कालराने पोस्टमध्ये लिहिलंय की, "घरात चोरी झाली असूनही त्याविषयी कोणतीही कारवाई होत नाही आहे. आपली व्यवस्था इतकी कमकुवत झाली आहे की लोक अजूनही आरामात आहेत आणि याविषयी काहीच कारवाई करत नाहीत. माझ्या घरातील कॅमेरा आणि एसडी कार्डही चोरीला गेले आहे. दोन दरवाजे तुटलेले आहेत आणि कोणालाही काहीच कळले नाही." अशी उद्विग्न पोस्ट बंदगीने शेअर केली आहे.
या घटनेनंतर बंदगी कालरा खूपच निराश झाली आहे. तिने म्हटले आहे की, "मला कधीच इतकं असहाय्य वाटलं नाही. मला आपल्या सिस्टमवर विश्वास उरलेला नाही. ३० तास उलटून गेल्यानंतर मला ही गोष्ट समजते." बंदगीसोबत घडलेली ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रीणींनी बंदगी कालराला धीर देण्याचे प्रयत्न केले आहेत. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. बंदगीच्या चोरी झालेल्या वस्तू लवकरच सापडतील आणि चोर गजाआड जाईल, अशी तिच्या चाहत्यांना आशा आहे.