Bigg Boss 11 : हिंतेनसोबत फ्लर्ट करणाऱ्या अर्शी खानबद्दल, पत्नी गौरी प्रधानने म्हटले ‘नो प्रॉब्लेम’ !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 11:24 AM2017-12-08T11:24:23+5:302017-12-08T17:02:33+5:30

बिग बॉस शोच्या पहिल्या दिवसापासूनच हितेन तेजवानीसोबत फ्लर्ट करणाºया अर्शी खानबद्दल हितेनची पत्नी गौरी प्रधानने ‘नो प्रॉब्लेम’ असे म्हटले. वाचा सविस्तर!

Bigg Boss 11: Arshi Khan, wife, who is flirting with Hinteen, wife Gauri Pradhan said, 'No Problem!' | Bigg Boss 11 : हिंतेनसोबत फ्लर्ट करणाऱ्या अर्शी खानबद्दल, पत्नी गौरी प्रधानने म्हटले ‘नो प्रॉब्लेम’ !

Bigg Boss 11 : हिंतेनसोबत फ्लर्ट करणाऱ्या अर्शी खानबद्दल, पत्नी गौरी प्रधानने म्हटले ‘नो प्रॉब्लेम’ !

googlenewsNext
ग बॉस या रिअ‍ॅलिटी शोचा या आठवड्याचा लक्झरी बजेट टास्क खूपच इंटरेस्टिंग असा जात आहे. शोमध्ये सहभागी असलेल्या स्पर्धकाचे आप्तस्वकीय गेल्या गुरुवारी घरात प्रवेश करताना बघावयास मिळाले. त्यामुळे शोमध्ये खूपच भावुक असे वातावरण झाले होते. आजही (शुक्रवार) काही सदस्यांचे आप्तस्वकीय घरात प्रवेश करणार असल्याने शोमध्ये रोमॅण्टिक तसेच भावनिक वातावरण बघावयास मिळणार आहे. आज शोमध्ये हितेन तेजवानीची पत्नी अभिनेत्री गौरी प्रधान घरात प्रवेश करताना दिसणार आहे. गौरी शोमध्ये येताच हितेनचा मित्र विकास गुप्ता आणि हीना खानवर जाहीरपणे तिची नाराजगी व्यक्त करणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हितेनसोबत नेहमीच फ्लर्ट करणाºया अर्शी खानला गौरी एंटरटेनिंग म्हणताना दिसेल. 

बिग बॉसच्या ट्विटर अकाउंटवर शोचा एक प्रोमो व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. ज्यामध्ये हितेनची पत्नी गौरी प्रधान घरात एंट्री करताना दिसत आहे. गौरी घरात प्रवेश करताच सर्वात अगोदर पुनीश शर्माची भेट घेते, तसेच हितेनला सहकार्य केल्याबद्दल त्याचे आभार मानते. त्यानंतर ती शिल्पा शिंदेची गळाभेट घेते. तसेच या घरातील तू सर्वात कमी वयाची आई असल्याचे तिला म्हणते. पुढे ती हितेनला भेटते. हितेनशी बोलताना गौरी म्हणते की, ‘मला असे वाटत होते की, तुला भेटताना मी रडणार नाही. परंतु एवढे दिवस तुझ्यापासून दूर असल्यामुळे माझ्या डोळ्यातून अश्रू येत आहेत.’ यावेळी हितेनही भावुक झाल्याचे दिसून येते. 
 }}}} ">.@gpradhan7774 enters the #BB11 house to meet @tentej! Watch their reunion tonight at 10:30 PM. #BB11#BBSneakPeekpic.twitter.com/qfQSRAsjK7— COLORS (@ColorsTV) December 8, 2017
पुढे गौरी हितेनची भेट घेतल्यानंतर विकास गुप्ताला म्हणताना दिसत आहे की, ‘मास्टरमाइंड गेम प्लॅनमुळे आपल्या मित्रांना दगा देऊ नको, तर अर्शीला गौरी म्हणते की, मला तुला भेटायचे होते. तुझी अन् हितेनच्या चेष्टामस्करीमुळे मला काहीही प्रॉब्लेम नाही. उलट तुम्हा दोघांची ही केमिस्ट्री सगळ्यांनाच भावत आहे. त्यानंतर गौरी हीनाचा क्लास घेताना दिसली. गौरी म्हणते की, ‘तो (हिंतेन) चांगला खेळत आहे. मी त्याला जो ‘बी अ लीडर नॉट अ फॉलोअर’ हा मेसेज पाठविला होता तो केवळ त्याच्यासाठी होता. त्यानंतर गौरी घराबाहेर पडताना दिसली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गौरीने हितेनकरिता एक फोटो फ्रेम पाठविली होती. त्यामध्ये लिहिले होते की, ‘बी अ लीडर नॉट अ फॉलोअर’! मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या एका टास्कदरम्यान हीना हितेनला टोमणा मारताना या मेसेजचा उल्लेख करताना दिसली होती. त्यामुळेच गौरी हीनाला त्या मेसेजचा अर्थ समजावून सांगताना दिसत आहे. 

Web Title: Bigg Boss 11: Arshi Khan, wife, who is flirting with Hinteen, wife Gauri Pradhan said, 'No Problem!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.