'बिग बॉस १'चा विजेता सध्या काय करतो? करिअरमध्ये झाला फ्लॉप, ब्रेन स्ट्रोकनंतर झालीय त्याची अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 17:51 IST2025-09-06T17:50:54+5:302025-09-06T17:51:49+5:30

Bigg Boss 1 : भारतात 'बिग बॉस'ची सुरुवात ३ नोव्हेंबर २००६ रोजी झाली होती. शोचा पहिला सीझन सोनी टीव्हीवर प्रसारित झाला होता.

bigg boss 1 winner rahul roy career flop life changed after brain stroke know where is he now | 'बिग बॉस १'चा विजेता सध्या काय करतो? करिअरमध्ये झाला फ्लॉप, ब्रेन स्ट्रोकनंतर झालीय त्याची अशी अवस्था

'बिग बॉस १'चा विजेता सध्या काय करतो? करिअरमध्ये झाला फ्लॉप, ब्रेन स्ट्रोकनंतर झालीय त्याची अशी अवस्था

सलमान खान(Salman Khan)चा टीव्ही रिॲलिटी शो 'बिग बॉस १९' (Bigg Boss 19) पहिल्या दिवसापासूनच लोकांचा आवडता शो बनला आहे. या शोमधील स्पर्धक त्यांच्या खेळाने प्रेक्षकांना खूप प्रभावित करत आहेत. पण, आज आम्ही तुम्हाला शोच्या पहिल्या सीझनचा विजेता कोण होता, हे माहित आहे का? पहिला सीझन कधी प्रसारित झाला आणि तो कोणी जिंकला हे जाणून घ्या.

भारतात 'बिग बॉस'ची सुरुवात ३ नोव्हेंबर २००६ रोजी झाली होती. शोचा पहिला सीझन सोनी टीव्हीवर प्रसारित झाला होता. या सीझनचे सूत्रसंचालन बॉलिवूड अभिनेता अरशद वारसीने केले होते. या सीझनमध्ये १५ सेलिब्रिटींनी भाग घेतला होता, ज्यात राहुल रॉय, कॅरल ग्रेसियस, रवी किशन, राखी सावंत, अमित साध, रुपाली गांगुली, बाबा सहगल, रागिणी शेट्टी, दीपक तिजोरी, अनुपमा वर्मा, आर्यन वैद, कश्मीरा शाह, दीपक पाराशर, बॉबी डार्लिंग, सलिल अंकोला यांचा समावेश होता.

'बिग बॉस सीझन १' चा विजेता कोण होता?
या शोचा पहिला सीझन ब्लॉकबस्टर चित्रपट 'आशिकी' फेम अभिनेता राहुल रॉय यांनी जिंकला होता. त्यावेळी राहुलला बिग बॉसची ट्रॉफी आणि १ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते. मात्र, हे यश त्याला फारसे उपयोगी पडले नाही आणि तो हळूहळू ग्लॅमरच्या जगापासून दुरावला.


राहुल रॉयला झालेला ब्रेन स्ट्रोक 
२०२० मध्ये, राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोक झाल्याची बातमी समोर आली होती. आता मात्र त्याची तब्येत बरी आहे. अभिनेता सध्या आपल्या आरोग्याची काळजी घेत आहे. तो अभिनयापासून दूर आहे, पण कधी कधी रिॲलिटी शोमध्ये दिसतो. याशिवाय राहुल सोशल मीडियावरही सक्रीय असतो, जिथे तो वेळोवेळी चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो.

Web Title: bigg boss 1 winner rahul roy career flop life changed after brain stroke know where is he now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.