Bigg Boss Marathi 3 update :विकास स्वत:साठी खेळतो मीनलने केली विकासची चुगली !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 16:39 IST2021-11-05T16:39:59+5:302021-11-05T16:39:59+5:30
Bigg Boss Marathi 3: नीथा मीनल यांची टास्क संबधित चर्चा रंगलेली दिसणार आहे.

Bigg Boss Marathi 3 update :विकास स्वत:साठी खेळतो मीनलने केली विकासची चुगली !
मुंबई ५ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. कोणता सदस्य कधी कोणाबरोबर कसा वागेल हे सांगणं कठीणच. सध्या घरामध्ये असेच काहीसे वातावरण निर्माण झाले आहे. कोणीही कोणावर विश्वास ठेवूच शकत नाही असेच सद्या पाहायला मिळत आहे. घरात सदस्य इतर सदस्यांची चुगली करताना दिसत आहेत. जसं तृप्ती देसाईने गायत्री आणि मीराला स्नेहाबद्दल काही गोष्टी सागंतिल्या. स्नेहाने तृप्ती देसाईंबद्दल मीनल, नीथा, सोनालीकडे चुगली करताना दिसली. तसंच आता मीनल चक्क विकासची चुगली घरामध्ये नुकत्याच आलेल्या सदस्याला म्हणजे नीथा जवळ बोलताना दिसणार आहे.
नीथा मीनल यांची टास्क संबधित चर्चा रंगलेली दिसणार आहे. नीथा मीनलला सांगणार आहे, भोपळ्याच्या टास्कमध्ये ती गेली बिनधास्त, आली...मग तो गेम वाटतं नाही ना ... मीनल म्हणाली, तेच होत ना दोन टीम्स पाडून सुध्दा तुम्ही या टीममधून स्वत:च्या व्यक्तिला तिकडे सपोर्ट करता. म्हणून काल पहिल्यांदा जय, उत्कर्ष आणि माझं काय बोलणं झालं की त्या दोघांनी या दोघांचं नीथा म्हणाली विकास पण इकडचं तिकडे करतो. मीनल म्हणाली, हे माहिती आहे सगळ्यांना म्हणूनच त्यादिवशी नरक आणि स्वर्ग टास्क जेव्हा झाला तेव्हा तो का माझ्यावरती भडकला होता. मी एक वाक्य बोलले होते त्याला आणि तेच त्याला खूप लागलं. की तू स्वत:साठी खेळतोस आणि मी माझ्या टीमसाठी खेळते, आणि हे खरं आहे ते त्याला देखील माहिती आहे. आम्हांला सगळ्यांना आणि या घराला देखील माहिती आहे.