विवाहित कुमार सानूंबरोबर जोडलं नाव, ६ वर्ष लिव्ह इनमध्ये राहिली अन्...! 'त्या' चर्चांवर अभिनेत्री स्पष्टच बोलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 10:56 IST2025-11-27T10:51:41+5:302025-11-27T10:56:49+5:30
"मी कोणाचाही संसार उद्ध्वस्त केला नाही...", कुमार सानू यांच्यासोबतच्या नात्यावर कुनिका सदानंदचं वक्तव्य

विवाहित कुमार सानूंबरोबर जोडलं नाव, ६ वर्ष लिव्ह इनमध्ये राहिली अन्...! 'त्या' चर्चांवर अभिनेत्री स्पष्टच बोलली
Kunickaa Sadanand: छोट्या पडद्यावरील वादग्रत असणारा तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे बिग बॉस. सुरुवातीपासूनच हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता हा बहुचर्चित कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहोचला असून गेम अधिकच रोमांचक होत चालला आहे. फिनालेला फक्त काहीच दिवस बाकी असताना चाहत्यांनी आपल्या फेव्हरेट स्पर्धकासाठी भरभरून वोट्स करायला सुरुवात केली आहे.या शोममुळे सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या स्पर्धकांपैकी एक म्हणजे कुनिका सदानंद.आता त्या या शोमधून बाहेर पडल्या आहेत.सध्या कुनिका यांनी एका मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.
बिग बॉस च्या घरात असताना कुनिका यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले. या शोमध्ये त्यांनी रिलेशनशिप, अफेअर्स यावर भाष्य केलं. इतंकच नाहीतर कुनिका यांनी शोमध्ये कुमार सानू यांच्याबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर घराबाहेर आल्यानंतर त्यांनी युटर्न घेतल्याचा दिसतोय. आपण कोणाचाही संसार मोडला नाही, असं त्यांनी एका मुलाखतीत केलं आहे.
नुकताच कुनिका यांनी सोबत संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, माझ्या मनात कुमार सानूच्या मुलांबद्दल कोणताही द्वेष नाही. मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगते की, मी कोणाचाही संसार उद्धवस्त केला नाही.त्यांच्या वडिलांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. कारण, त्यांच्या लग्नात अडचणी होत्या. जर माझ्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर त्यांनी यातून बरं व्हावं. माझ्या मनात त्यांच्याबद्दल फक्त प्रेम आहे. जान बिग बॉसमध्ये आला तेव्हा मी २-३ एपिसोड पाहिले. मी त्याच्यासाठी एपिसोड पाहिले.कारण, कुमार सानू यांनी त्याला पाठिंबा दिला होचा. पण, तरीही तो त्यांच्याबद्दल वाईट बोलला. मीच कुमार सानु यांना समजावलं, कारण कुठेतरी कुमार मी, कुमार सानू आणि त्यांची पत्नी रीतामुळे ते दुखावले गेले.
कुनिका व कुमार सानू यांचं ९० च्या दशकात अफेअर होतं. कुमार सानूची पहिली पत्नी गरोदर असताना तो कुनिकाबरोबर राहत होते. मात्र, तरीही कुनिका विवाहित कुमार सानूबरोबर ६ वर्षे लिव्ह इनमध्ये राहिली होती. पण, त्यांच्या आयुष्यात दुसरी महिला आल्यावर तिने या नात्याला पूर्णविराम दिला.