बिग बॉस : सनीच्या खुलाशामुळे बिग बॉसची विश्वासार्हता धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2016 16:53 IST2016-12-25T16:36:43+5:302016-12-25T16:53:56+5:30

काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या घरात गेस्ट जज म्हणून आलेल्या अभिनेत्री सनी लिओनी हिने केलेल्या खुलाशामुळे ‘बिग बॉस’ या शोची ...

Big Boss: Due to Sunny's disclosures, the Big Boss credibility threat | बिग बॉस : सनीच्या खुलाशामुळे बिग बॉसची विश्वासार्हता धोक्यात

बिग बॉस : सनीच्या खुलाशामुळे बिग बॉसची विश्वासार्हता धोक्यात

ही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या घरात गेस्ट जज म्हणून आलेल्या अभिनेत्री सनी लिओनी हिने केलेल्या खुलाशामुळे ‘बिग बॉस’ या शोची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. ‘बिग बॉस सीजन - ५’ची कंटेस्टेंट राहिलेली सनी तब्बल ११ वर्षांनंतर शोमध्ये आली होती अन् असा काही धमाका करून गेली की त्यावरून ‘बिग बॉस’ या शोच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. 



लोपामुद्रा राऊत हिला पोल डान्स करण्याचा टास्क दिला होता
त्याचे झाले असे की, सनी बिग बॉसच्या घरात जाऊन आल्यानंतर तिला घरातील कंटेस्टेंट लोपामुद्रा राऊत हिचा पोल डान्स कसा वाटला? असे विचारण्यात आले होते. त्यावर सनीने जे उत्तर दिले ते ऐकून सगळेच आश्चर्यचकीत झाले. ती म्हटली की, मी हा डान्स बघितला नाही. पण मला खात्री आहे की, लोपाने केलेला डान्स चांगला असेल. कारण ती सुंदर आहे. वास्तविक सनीनेच लोपाला हा टास्क दिला होता. लोपा जेव्हा लोपा पोल डान्स करीत होती, तेव्हा सनी त्यास जज करीत असल्याचे प्रेक्षकांनी बघितले. मात्र आता सनीने लोपाचा हा पोल डान्स बघितलाच नसल्याचे तिने सांगितल्याने खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर तिने लोपाला या पोल डान्ससाठी कुठल्या आधारे विनर घोषित केले याविषयीदेखील आता शंका उपस्थित केली जात आहे. 



बिग बॉस सीजन-५ मध्ये सनी लिओनी हिने पोल डान्स केला होता
त्याचबरोबर लोकांच्या मनात शो स्क्रीप्टेड असल्याच्या शंकेलाही आता काहीशी बळकटी मिळत आहे. काहीही असो सनीचा हा खुलासा बिग बॉस शोसाठी बरेचसे प्रश्न उपस्थित करणारा असल्याने भविष्यात शोच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होवू शकतात.   

Web Title: Big Boss: Due to Sunny's disclosures, the Big Boss credibility threat