"तेव्हा बी-ग्रेड सिनेमांतही काम केलं, कारण...", लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला 'तो' वाईट काळ, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 11:26 IST2026-03-12T11:24:35+5:302026-03-12T11:26:11+5:30

"पैशांसाठी बी-ग्रेड सिनेमे केले... प्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली-"त्याचा मला पश्चात्ताप…"

bhojpuri actress monalisa talk about struggle says she worked in 25 b grade movies for money | "तेव्हा बी-ग्रेड सिनेमांतही काम केलं, कारण...", लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला 'तो' वाईट काळ, म्हणाली...

"तेव्हा बी-ग्रेड सिनेमांतही काम केलं, कारण...", लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला 'तो' वाईट काळ, म्हणाली...

Actress Monalisa: चित्रपटसृष्टीत नशीब आजमावायला येणाऱ्या प्रत्येकालाच इथे संधी मिळते असे नाही, काहींना मिळते तर काहींना ती उशीरा मिळते तर काही निराश होवून घरचा रस्ता पकडतात. मात्र काही कलावंत या सर्व पातळ्यांवर यशस्वी होत बहुप्रतीक्षेनंतर नाव कमावतात, त्यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री मोनालिसा. अभिनेत्री मोनालिसा ही भोजपुरी इंडस्ट्रीतील लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. मोनालिसाने भोजपुरीशिवाय हिंदी, उडिया, बंगाली आणि दक्षिण भारतीय भाषेतील चित्रपटात काम केलं आहे. मोनालिसाने म्यूझिक व्हिडीओच्या माध्यमातून तिच्या करिअरला सुरुवात केली. मात्र,अनेक अडचणींनवर मात करून तिने हा पल्ला गाठला आहे.

अभिनयाच्या ग्लॅमरस जगात काम करणाऱ्यांची लाईफस्टाईलचं देखील अनेकांना आकर्षण असतं. मात्र, या कलाकारांना हे सगळं यश, प्रसिद्धी त्यांना प्रचंड संघर्षातून मिळालेली अअसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री मोनालिसाने तिच्या संघर्षकाळातील आठवणी शेअर केल्या आहेत.अलिकडेच सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली," मला तौबा-तौबा चित्रपटाची ऑफर मिळाली होती. या चित्रपटाचं बजेट खूप कमी होतं. या चित्रपटात पायल रोहतगीची मुख्य भूमिका होती आणि तर सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत मी होते."

यानंतर मग पुढे मुलाखतीत ती म्हणाली,"या चित्रपटानंतर मी खऱ्या अर्थानं नावारुपाला आले.मग त्यानंतर मला एकामागोमाग एक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. त्यावेळी मी जवळपास २५ बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यापैकी अर्ध्याहून अधिक चित्रपट तर प्रदर्शित झालेच नाहीत. खरंतर, यासाठी मी कृतज्ञ आहे की ते रिलीज झाले नाहीत. पण मला पडद्यावर इंटिमेट सीन करताना कधीच कोणती समस्या आली नाही."

मला जे काम मिळत गेलं, ते मी करत गेले कारण...

"मी आणि माझा पती विक्रांत अजूनही आर्थिकदृष्ट्या स्थिर नाही. कारण आमच्या दोघांच्याही पालकांना आरोग्याच्या समस्या आहेत. त्यामुळे आम्ही जेवढं कमावतो, ते सर्व पैसे उपचारासाठी खर्च होतात. पण सुदैवाने राहण्यासाठी मोठं घर आहे आणि वीज, पाणी यांसारख्या मुलभूत गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत नाही. कारण एकेकाळी आम्ही या समस्यांचाही सामना केला आहे. त्यामुळे त्या परिस्थितीत मला जे काम मिळत गेलं, ते मी करत गेली. त्याचा मला पश्चात्ताप नाही".असं स्पष्ट वक्तव्य अभिनेत्रीने मुलाखतीत केलं.

Web Title : मोनालिसा का बी-ग्रेड फिल्मों का खुलासा: संघर्ष और शोबिज में अस्तित्व

Web Summary : अभिनेत्री मोनालिसा ने वित्तीय बाधाओं और परिवार के स्वास्थ्य संबंधी मुद्दों के कारण बी-ग्रेड फिल्मों में अभिनय करने सहित अपने पिछले संघर्षों का खुलासा किया। उन्होंने अपनी यात्रा के लिए आभार और पछतावा व्यक्त किया।

Web Title : Monalisa's B-Grade Film Revelation: Struggle and Survival in Showbiz

Web Summary : Actress Monalisa reveals her past struggles, including acting in B-grade films due to financial constraints and family health issues. She expresses gratitude and lack of regret for her journey.