"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 14:37 IST2025-05-12T14:36:37+5:302025-05-12T14:37:39+5:30
भारतीचं कुटुंब अमृतसरमध्ये आहे. थायलंडमध्ये असल्याचं कारण सांगत म्हणाली...

"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
गेल्या अनेक दिवसांपासून भारत-पाकिस्तान या दोन्ही देशात तणावाचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत कॉमेडी क्वीन भारती सिंह (Bharti Singh) थायलंडमध्ये आहे. तिथे ती सुट्ट्या एन्जॉय करत असल्यावरुन तिला नेटकरी चांगलेच ट्रोल करत आहेत. भारतीचे आईवडील अमृतसर मध्ये आहेत जिथे हल्ल्याची भीती आहे आणि ही थायलंडमध्ये मजा करत आहे असं म्हणत तिला अनेकांनी सुनावलं. आता या ट्रोलिंगवर भारतीने व्हिडिओ शेअर करत सर्वांना उत्तर दिलं आहे.
भारती सिंह युट्यूबवर पॉडकास्ट करत असते. तसंच ती तिचे वैयक्तिक आयुष्यातील व्लॉगही शेअर करते. नुकतंच व्लॉगमध्ये तिने होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्टीकरण दिलं. ती थायलंडला का गेली आहे याचं कारण तिने सांगितलं. ती म्हणाली, "मला माहित आहे माझ्या शहरात सध्या भीतीचं वातावरण आहे. पण माझे कुटुंब सुरक्षित आहेत. मला आपल्या देशावर आणि सरकारवर पूर्ण विश्वास आहे. भारत एकदम स्ट्राँग देश आहे आणि कोणीही आपल्या देशाचं काहीही बिघडवू शकत नाही."
ती पुढे म्हणाली, "पण मला तुमचे कमेंट्स वाचून खूप राग आलाय. तुम्ही सगळे किती भोळे आहात. मला हे स्पष्ट करायचं आहे की मी इथे सुट्टी एन्जॉय करायला आलेले नाही. आमचं इथे १० दिवसांचं शूट शेड्युल आहे. तीन महिन्यांपूर्वीच याविषयी कमिटमेंट दिली होती. यासंबंधी सर्व तयारीही झाली होती. प्रोफेशनल कमिटमेंट्स न पाळणंही चुकीचंच आहे."
हे सांगताना भारतीला मध्येच रडूही कोसळतं. आपल्याला देशाची आणि कुटुंबियांची काळजी नसल्याचं लोकांना वाटतंय हे पाहून भारतीला वाईट वाटलं. सध्या भारती फोनवरुन सतत कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचंही तिने स्पष्ट केलं.ो