'चला हवा येऊ द्या'मधून ब्रेक घेत गावात शेतात रमलेले दिसले भारत गणेशपुरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 11:39 IST2025-08-04T11:37:42+5:302025-08-04T11:39:23+5:30

Bharat Ganeshpure: सध्या भारत गणेशपुरे 'चला हवा येऊ द्या-कॉमेडीचा गँगवार'मध्ये पाहायला मिळत आहेत. मात्र आता त्यांनी त्यातून ब्रेक घेत त्यांच्या गावी पोहचले आहेत आणि तिथे शेतात रोपे लावताना दिसले.

Bharat Ganeshpure was seen enjoying the fields in the village while taking a break from 'Chala Hawa Yeu Dya'. | 'चला हवा येऊ द्या'मधून ब्रेक घेत गावात शेतात रमलेले दिसले भारत गणेशपुरे

'चला हवा येऊ द्या'मधून ब्रेक घेत गावात शेतात रमलेले दिसले भारत गणेशपुरे

२०१४ साली सुरू झालेल्या 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) शोमधून भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. भारत गणेशपुरे यांचा इथवरचा प्रवास तितका सोप्पा नव्हता. अपार कष्ट आणि मेहतनीच्या जोरावर ते इथपर्यंत पोहचले आहेत. आता ते पुन्हा एकदा 'चला हवा येऊ द्या-कॉमेडीचा गँगवार'मध्ये पाहायला मिळणार आहेत. मात्र आता त्यांनी त्यातून ब्रेक घेत त्यांच्या गावी पोहचले आहेत आणि तिथे शेतात रोपे लावताना दिसले. 

अभिनेता भारत गणेशपुरे चला हवा येऊ द्याच्या नवीन सीझनमध्ये पाहायला मिळत आहेत. मात्र त्यांनी या कार्यक्रमातून ब्रेक घेतला आहे आणि ते सध्या त्यांच्या गावी पोहोचले आहेत. अकोला येथून काटोल गोल्ड जातीची मोसंबीची रोपं त्यांनी मागवली आहेत. तसेच आंब्याचीही काही रोपं मागवून त्यांनी त्यांच्या शेतात लागवड केली आहे. अभिनयातून वेळ काढत अभिनेता अनेकदा शेतात रमताना दिसतात.


भारत गणेशपुरे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात भारत गणेशपुरे यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. ग्रामीण शैलीतील त्यांचे डायलॉग प्रेक्षकांना प्रचंड आवडायचे. चला हवा येऊ द्यासोबतच त्यांनी चित्रपटातही काम केलं आहे. यात झोल झाल, शिकारी, जलसा, झांगडगुत्ता यासह इतर सिनेमांचा समावेश आहे. मी पुन्हा येईन या वेबसीरिजमध्येही त्यांनी काम केलंय.

Web Title: Bharat Ganeshpure was seen enjoying the fields in the village while taking a break from 'Chala Hawa Yeu Dya'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.