WHAT! नेहा पेंडसे Bhabiji Ghar Par Hainला करणार रामराम, नव्या अनिता भाभीचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 18:25 IST2022-02-02T18:21:04+5:302022-02-02T18:25:46+5:30
'भाभीजी घर पर हैं' (Bhabiji Ghar Par Hain)या लोकप्रिय शोच्या चाहत्यांना आम्ही एक शॉकिंग बातमी देणार आहोत.

WHAT! नेहा पेंडसे Bhabiji Ghar Par Hainला करणार रामराम, नव्या अनिता भाभीचा शोध सुरू
'भाभीजी घर पर हैं' (Bhabiji Ghar Par Hain)या लोकप्रिय शोच्या चाहत्यांना आम्ही एक शॉकिंग बातमी देणार आहोत. अनिता भाभी म्हणजेच नेहा पेंडसे (Nehha Pendse) लवकरच या शोला टाटा बाय बाय करणार आहे. निर्मात्यांनी पुन्हा एकदा नवीन अनिता भाभीचा शोध सुरू केला आहे.
आजतकच्या रिपोर्टनुसार, नेहा पेंडसे(Nehha Pendse) चा करार संपला आहे आणि ती काही महिन्यांतच शो सोडणार आहे. अनिता भाभीच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी अनेकअभिनेत्रींचे ऑडिशन घेतले आहे. युनिटशी संबंधित एका व्यक्तीचा हवाला देत रिपोर्टमध्ये लिहिले आहे - होय, आम्ही अनिता भाभीच्या भूमिकेसाठी नव्या अभिनेत्रीच्या शोधात आहोत. यासाठी अनेक अभिनेत्रींनी ऑडिशनही दिल्या आहेत.
"नेहा पेंडसे(Nehha Pendse) ने शो सोडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लांबचा प्रवास. नेहाला सेटवर येण्यासाठी अनेक तास प्रवास करावा लागतो. तिला सेटवरून घरी आणि घरातून सेटवर जाण्यासाठी अनेक तास लागतात. त्याचा परिणाम तिच्या आरोग्यावरही होतो आहे. निर्माते आणि अभिनेत्रींना वाटले की ते मॅनेज करतील पण आता ते कठीण दिसत आहे.
नेहाच्या आधी अनिता भाभीची भूमिका सौम्या टंडनने साकारली होती. ऑगस्ट 2020 मध्ये सौम्याने शो सोडला. नेहा पेंडसेने जानेवारी २०२१ मध्ये शोमध्ये एंट्री झाली. शोचे निर्माते बेनाफिर कोहली किंवा नेहा पेंडसेने शो सोडण्याबाबत कोणतीच कमेंट केलेले नाही. शो सोडल्याची ही बातमी ऐकून नेहा पेंडसेचे चाहते नक्कीच निराश झाले असतील. पण या शूटचा नेहाच्या तब्येतीवर परिणाम व्हावा, असे चाहत्यांनाही वाटत नाही. या शोचे चाहते आता नवीन अनिता भाभीबद्दल जाणून घेण्याची वाट पाहत आहेत.