Vidisha Srivastava: प्रेग्नेंट आहे 'भाभीजी घर पर हैं'मधील अनिता भाभी, विदिशा श्रीवास्तवचं मॅटर्निटी फोटोशूट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 16:39 IST2023-06-09T16:27:30+5:302023-06-09T16:39:21+5:30
अभिनेत्रीने २०१८ मध्ये तिने सायक पॉलसोबत लग्नगाठ बांधली.

Vidisha Srivastava: प्रेग्नेंट आहे 'भाभीजी घर पर हैं'मधील अनिता भाभी, विदिशा श्रीवास्तवचं मॅटर्निटी फोटोशूट व्हायरल
भाभीजी घर पर हैं या गाजलेल्या मालिकेतील गोरी मैम म्हणजेच अभिनेत्री विदिशा श्रीवास्तव सध्या चर्चेत येत आहे. विदिशा श्रीवास्तव प्रग्नंट असून ती लवकरच आई होणार आहे.विदिशा श्रीवास्तवने डिसेंबर 2018 मध्ये सायक पॉलसोबत लग्न केले. या जोडप्याने नुकतेच मॅटर्निटी फोटोशूट करत अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून विदिशा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा होत्या.
विदिशा श्रीवास्तवने तिच्या मॅटर्निटी फोटोशूटसाठी लाल रंगाचा ड्रेस निवडला होता. लाल रंगाच्या साडीने बेबी बम्प फ्लॉंट करताना दिसतेय. याशिवाय ती काही फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये होते आहे. अभिनेत्रीचे फोटो पाहून अदांज लावला जातोय तिची प्रेग्नेंसी शेवटच्या टप्प्यात आहे आणि काही आठवड्यात ती आई होणार आहे.
बाळाच्या जन्मानंतर त्याच्या संगोपनासाठी विदिशा ३ महिन्यांचा ब्रेकही घेणार असल्याचं बोललं जातंय.
सायक पॉलसोबत विदिशाने गुपचूप लग्न केलं होतं. विशेष म्हणजे विदिशाने जवळपास ४ वर्ष ही गोष्ट लपवून ठेवली. अलिकडेच तिच्या लग्नाचं सत्य समोर आलं आहे. भाभाजी घर पर हैं या मालिकेत आतापर्यंत तीन अभिनेत्रींनी अनिता भाभीची भूमिका केली आहे. यात पहिले सौम्या टंडन, नेहा पेंडसे आणि आता विदिशा श्रीवास्तव या अभिनेत्रींचा समावेश आहे.