"डोक्यावरून क्षेपणास्त्रं जातायत तरीही दुबई सुरक्षित, पण दिल्ली नाही" अभिनेत्रीच्या विधानाने पेटला नवा वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 15:34 IST2026-03-06T14:52:23+5:302026-03-06T15:34:42+5:30
अभिनेत्री सध्या दुबईमध्ये आहे. तिने तिथून एक व्हिडीओ शेअर केला.

"डोक्यावरून क्षेपणास्त्रं जातायत तरीही दुबई सुरक्षित, पण दिल्ली नाही" अभिनेत्रीच्या विधानाने पेटला नवा वाद
Bebika Dhurve : 'बिग बॉस ओटीटी २' फेम बेबीका धुर्वे ही कायम चर्चेत असते. ती एक अभिनेत्री, मॉडेल आणि दंतचिकित्सक आहे. ती सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धादरम्यान बेबीकाने दुबईतील परिस्थितीची तुलना थेट दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेशी केली. "माझ्या डोक्यावरून क्षेपणास्त्रं जातायत तरीही दुबई सुरक्षित, पण दिल्ली नाही", असं तिनं म्हटलं. तिच्या या विधानामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
बेबीका धुर्वे सध्या दुबईमध्ये आहे. तिने तिथून एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये ती म्हणाली, "दुबईमध्ये रात्री ९ वाजता माझ्या डोक्यावरून क्षेपणास्त्रे उडत आहेत, तरीही मी इथे खूप सुरक्षित आहे. पण जर मी दिल्लीत असते, तर रात्री ९ वाजता घराबाहेर पडण्याची हिंमतही करू शकले नसते". तिच्या या विधानाचा रोख दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेकडे होता, मात्र युद्धाच्या परिस्थितीत तिनं देशाचा अपमान केल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
बेबीकाचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेचा वर्षाव केला. एका युजरने लिहिले, "परदेशात जाऊन स्वतःच्या देशाचा अपमान करणे लज्जास्पद आहे. जर तुला क्षेपणास्त्रांच्या सावलीत सुरक्षित वाटत असेल, तर पुन्हा भारतात येण्याची तसदी घेऊ नकोस". तर दुसऱ्याने लिहलं, "असे लोक देशावर ओझे आहेत, हिला कायमचं तिथेच ठेवा".
It’s shameful to insult your own country while abroad.
— pyara_inssan (@pyra_insan) March 5, 2026
If you feel safer under missiles than in Delhi, then don’t bother coming back to India.
We value loyalty over such baseless comparisons.#The50#ElvishYadav#IndiaComesFirstpic.twitter.com/gVDEvJX2Ez
इराण आणि इस्रायलमधील संघर्ष या काळात अनेक भारतीय कलाकार दुबईमध्ये अडकले आहेत. अभिनेत्री सोनल चौहान आणि ईशा गुप्ता यांनी पंतप्रधान मोदींकडे मदतीची मागणी केली होती, त्यानंतर त्यांना सुखरूप भारतात आणण्यात आले. सध्या अभिनेत्री लारा दत्ता देखील तिच्या मुलीसह परदेशात अडकली आहे.
कोण आहे बेबीका धुर्वे?
बेबीका धुर्वे ही केवळ अभिनेत्रीच नाही तर एक डेंटिस्ट आणि डेटिंग एक्सपर्ट देखील आहे. तिने 'भाग्य लक्ष्मी' या मालिकेत काम केले असून 'बिग बॉस ओटीटी २' मुळे तिला मोठी प्रसिद्धी मिळाली. तिचे वडील जनार्दन धुर्वे हे प्रसिद्ध ज्योतिषी असून त्यांनी अनेकदा सलमान खानच्या शोमध्ये हजेरी लावली आहे.