'बालिका वधू' फेम नेहा मर्दा लग्नाच्या 10 वर्षांनंतर झाली आई, दिला गोंडस बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 09:26 AM2023-04-08T09:26:06+5:302023-04-08T09:34:38+5:30

बालिका वधू' फेम नेहा मर्दा आई झाली आहे. प्रेग्नंसी पूर्वी कॉम्प्लिकेशन्स आल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.

Balika vadhu fame neha marda give birth baby girl | 'बालिका वधू' फेम नेहा मर्दा लग्नाच्या 10 वर्षांनंतर झाली आई, दिला गोंडस बाळाला जन्म

'बालिका वधू' फेम नेहा मर्दा लग्नाच्या 10 वर्षांनंतर झाली आई, दिला गोंडस बाळाला जन्म

googlenewsNext

'बालिका वधू', 'डोली अरमानो की'सह अनेक टीव्ही शोमधून लोकांच्या मनावर राज्य करणारी नेहा मर्दा(Neha Marda Daughter) आई झाली आहे. काल संध्याकाळी तिने एका छोट्या परीला जन्म दिला आहे. गुरुवारी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रेग्नेंन्सीशी संबंधित समस्यांमुळे तिला दाखल करण्यात आले होते. डिलीव्हरी पूर्वी तिने हॉस्पिटलच्या बेडवरून स्वतःचे दोन फोटोही शेअर केले होते, ज्यामध्ये ती तिच्यावर उपचार करताना दिसत होती. पण आता ती पूर्णपणे बरी आहे आणि तिचं बाळही बरं आहे.


 नेहा मर्दा म्हणाली, “गर्भधारणेनंतर लगेचच, माझे बीपी असामान्य राहू लागले, ज्यामुळे मला काळजी वाटू लागली. आणि 5 व्या महिन्यात ते अनियमित झाले. आमच्या डॉक्टरांनी आम्हाला यासाठी आधीच तयार केले होते. अनेक गुंतागुंत अपेक्षित होत्या पण आम्ही नशीबवान होतो की सर्व काही ठीक झाले.

बाळाच्या जन्मानंतर नेहा म्हणाली, मी प्रेग्नेंट राहिल्यानंतर माझं बीपी असामान्य राहू लागले, ज्यामुळे मला काळजी वाटू लागली. आमच्या डॉक्टरांनी आम्हाला यासाठी आधीच तयार केले होते. अनेक गुंतागुंत अपेक्षित होत्या पण आम्ही नशीबवान होतो की सर्व काही ठीक झाले.

नेहा मर्दा पुढे म्हणाली, “मी आनंदी आहे की हा टप्पा संपला आहे आणि मला एक गोंडस मुलगी झाली आहे. दोघींची प्रकृती ठिक आहे." नेहाने असेही सांगितले की ही प्री-मॅच्युरिटी डिलिव्हरी होती. तिनं आणि तिचं बाळ सध्या हॉस्पिटलमध्येच आहे. परंतु लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा आहे.

नेहा मर्दा म्हणाली, “मला या आठवड्याच्या शेवटी डिस्चार्ज मिळेल आणि माझ्या मुलीला 15-20 दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा आहे. मला फक्त माझ्या बाळाला धरून त्याच्याकडे प्रेमाने पहायचे आहे. प्री-मॅच्युअर बेबी असल्याने तिला एनआयसीयूमध्ये नेण्यापूर्वी काहीवेळा ती माझ्यासोबत होती. ती अशक्त आहे, तिचं वजन थोडं वाढवावं  लागेल."

नेहा मर्दा ही छोट्या पडद्यावरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने 'डोली अरमानो की', 'बालिका वधू', 'क्यों रिश्तों में कट्टी बट्टी' आणि 'पिया अलबेला' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. लग्नाच्या 10 वर्षांनंतर ही अभिनेत्री आई झाली आहे. 

Web Title: Balika vadhu fame neha marda give birth baby girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.