Hansi Parmar Wedding : 'बालिका वधू' फेम अभिनेत्रीचा ग्वाल्हेरमध्ये पार पडला शाही विवाहसोहळा, Photos व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 10:34 IST2023-02-02T09:21:06+5:302023-02-02T10:34:31+5:30

हंसी परमार आता ग्वाल्हेरची सून झाली आहे. आकाश श्रीवास्तवशी तिने लग्नगाठ बांधली आहे.

balika vadhu fame actress got married in gwalior with long time boyfriend akash srivastav | Hansi Parmar Wedding : 'बालिका वधू' फेम अभिनेत्रीचा ग्वाल्हेरमध्ये पार पडला शाही विवाहसोहळा, Photos व्हायरल

Hansi Parmar Wedding : 'बालिका वधू' फेम अभिनेत्रीचा ग्वाल्हेरमध्ये पार पडला शाही विवाहसोहळा, Photos व्हायरल

Hansi Parmar Wedding :  सध्या सर्वत्र लग्नाचा सिझन सुरु झाला आहे. सेलिब्रिटी कपलही विवाहबंधनात अडकत आहेत. नुकतेच बालिका वधू फेम अभिनेत्री हंसी परमार लग्नबंधनात अडकली. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हंसी परमार आता ग्वाल्हेरची सून झाली आहे.  आकाश श्रीवास्तवशी तिने लग्नगाठ बांधली आहे.

हंसी आणि आकाशचा विवाह अगदी थाटामाटात ग्वाल्हेर येथे पार पडला. अगदी शाही पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. दोघांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांनी सात फेरे घेतले.हंसीने लग्नात लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तर आकाशने लाल सोनेरी रंगाची शेरवानी घातली होती. तसेच लाल रंगाचा फेटाही परिधान केला होता. 

दोघांची भेट कशी झाली ?

हंसी मूळची गुजरातची आहे. काही वर्षांपूर्वीच ती अभिनयासाठी मुंबईत आली होती. ती मुंबईत राहत होती तिथूनच जवळ आकाशही राहत होता. दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघे लग्नबंधनात अडकले आहेत. 

हंसीने टीव्ही शो सोबतच सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. रन बेबी रन, खिलाडी नं २०१, फोर्टी प्लस, जुनून, विशुद्धी अशा काही सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. बालिका वधू मालिकेतून तिला लोकप्रियता मिळाली. 

Web Title: balika vadhu fame actress got married in gwalior with long time boyfriend akash srivastav