राधे माँला निमंत्रण! 'बालिका वधू' फेम अविका गौरचं लग्न वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्रीवर होतेय टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 10:10 IST2025-09-27T10:08:08+5:302025-09-27T10:10:57+5:30
बालिका वधू फेम अभिनेत्री अविका गौरने तिच्या लग्नात राधे माँला जाहीर आमंत्रण दिल्याने सर्वजण तिच्यावर टीका करत आहेत

राधे माँला निमंत्रण! 'बालिका वधू' फेम अविका गौरचं लग्न वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्रीवर होतेय टीका
'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौर ही सर्वांची लाडकी अभिनेत्री. अविकाला 'बालिका वधू' या मालिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली. अविका लवकरच तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. अशातच काहीच दिवस बाकी असताना अविकाचं लग्न वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. यामागचं कारण म्हणजे, अविकाने वादग्रस्त अध्यात्मिक गुरु राधे माँला नॅशनल टेलिव्हिजनवर सर्वांसमोर जाहीर निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे तिचं लग्न वादाच्या भोवऱ्यात सापडलं असून अभिनेत्रीवर मोठ्या प्रमाणात टीका होतेय.
अविकाने राधे माँला निमंत्रण दिल्याने लोक भडकले
कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'धमाल विथ पती पत्नी और पंगा'मध्ये सध्या अभिनेत्री अविका गौर आणि तिचा होणारा नवरा मिलिंद चांदवानी यांच्या लग्नाचं सेलिब्रेशन सुरू आहे. त्यांचा हळदी समारंभ नुकताच पार पाडला असून, ते लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. मात्र, त्यांच्या या आनंदात राधे माँच्या एंट्रीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राधे माँकडून आशीर्वाद घेतल्याने अविका गौरच्या चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अविका गौर आणि मिलिंद चांदवानी यांनी त्यांच्या लग्नाचे कार्ड राधे माँला दाखवले आणि तिचे आशीर्वाद घेतले. ३० सप्टेंबरला हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. तिने सर्वांसमोर राधे माँला लग्नाचं निमंत्रण दिलं आहे. ज्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. राधे माँने नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या, "पती पत्नी और पंगाच्या धमाल शोमध्ये येऊन मला खूप आनंद झाला. अविका आणि मिलिंद यांच्या लग्नासाठी मी त्यांना मनापासून आशीर्वाद देते, त्यांची जोडी खूप सुंदर आहे." पण हे लोकांना आवडलं नाहीये.
चाहत्यांकडून शोवर टीका
अविकाने ही कृती करताच सोशल मीडियावर या फोटोंची आणि शोमध्ये राधे माँ यांना बोलावल्याच्या निर्णयाची जोरदार टीका झाली. नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आपला राग व्यक्त केला आहे, एका युजरने म्हटले, "ही फ्रॉड बाई जेलमध्ये होती ना?", दुसऱ्या एका युजरने लिहिले, "राधे माँ सारख्या महिलेला तुम्ही शोमध्ये घेऊन आलात, लाज वाटायला हवी." काहींनी याला 'पब्लिसिटी स्टंट' म्हटलं असून, "फ्रॉड शो, फ्रॉड राधे माँ, फ्रॉड पब्लिसिटी स्टंट. अशा कलाकारांवर आणि शोवर बहिष्कार टाका, नाहीतर येणारी पिढी बरबाद होईल," अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. आता अविकाच्या लग्नात खरंच राधे माँ येणार का आणि त्यामुळे पुन्हा नवा वाद निर्माण होईल का, हे पाहणं औत्सुक्याचं आहे.