नॅशनल टेलिव्हिजनवर लग्नबंधनात अडकली अविका गौर, क्युट कपलचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 17:56 IST2025-09-30T17:56:12+5:302025-09-30T17:56:38+5:30
'पती पत्नी और पंगा' शोच्या सेटवर झालं खरंखुरं लग्न

नॅशनल टेलिव्हिजनवर लग्नबंधनात अडकली अविका गौर, क्युट कपलचा व्हिडिओ व्हायरल
'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौर नुकतीच लग्नबंधनात अडकली. नॅशनल टेलिव्हिजनवर तिचा लग्नसोहळा संपन्न झाला. मिलिंद चंदवानीसह तिने काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा केला होता. यानंतर हे कपल 'पती पत्नी और पंगा' या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाले होते. याच शोमध्ये आता दोघांचं लग्नही झालं आहे. त्यांच्या लग्नाचे सर्व विधीही शोमध्येच झाले. टीव्हीवरील अनेक कलाकार या लग्नसोहळ्यात सामील झाले होते.
अविका गौर लग्नात लाल रंगाच्या भरजरी लेहेंग्यात सजली होती. या लेहेंग्यावर कमालीचं वर्क केलेलं दिसत आहे. शिवाय अनेक दागिनेही तिने परिधान केलेले दिसत आहेत. नथ, भांगेत कुंकू, राणी हार आणि भरघोस बांगड्या घालत तिने लूक पूर्ण केला. तर मिलिंद गुलाबी रंगाच्या शेरवानीमध्ये हँडसम दिसत आहे. त्याने फेटा बांधला आहे. लग्नानंतर दोघांनी कॅमेऱ्यासमोर पोज दिली. तेव्हा मिलिंदने अविकाला उचलूनही घेतलं. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. ढोल ताशाच्या गजरात त्यांनी कॅमेऱ्यासमोर डान्सही केला. सोशल मीडियावरील अनेक पेजेसवर त्यांचा त्यांचे व्हिडि, फोटो व्हायरल झाले आहेत.
छोटी आनंदी म्हणजेच सर्वांची लाडकी अविका गौर आता नवरी बनली आहे. मनपसंद जोडीदारासोबत तिचं लग्न झालं आहे. यामुळे तिच्या चाहत्यांनीही खूप आनंद झाला आहे. अविकाच्या या फोटोंवर सर्वांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
कोण आहे मिलिंद चंदवानी?
मिलिंद चंदवानीने आयआयएम अहमदाबादमधून एमबीएचं शिक्षण घेतलं आहे. नंतर त्याने इन्फोसिसमधून करिअरला सुरुवात केली. २०१८ मध्ये त्याने कॅम्पस डायरीज या एनजीओची स्थापना केली. एमटीव्ही रोडीज शोमध्येही त्याने सहभाग घेतला होता. त्याचा सोशल सर्विसकडे जास्त कल आहे. तसंच तो 'कुकू एफएम'मध्ये प्रोजेक्ट मॅनेजरही होता. मिलिंद आणि अविकाची भेट त्याच्या एनजीओच्या एका इव्हेंटमध्ये झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. अविका गौर २८ वर्षांची असून मिलिंद चंदवानी ३४ वर्षांचा आहे. दोघांमध्ये सहा वर्षांचं अंतर आहे.