'कारण गुन्ह्याला माफी नाही'मध्ये आस्ताद काळेची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 13:15 IST2023-05-10T13:14:21+5:302023-05-10T13:15:34+5:30

आस्ताद काळे नेहमी निरनिराळ्या धाटणीच्या व्यक्तिरेखा साकारताना आपल्याला दिसतो. 'कारण गुन्ह्याला माफी नाही' या मालिकेत आस्ताद नवा रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Astad Kales entry in karan gunhyala mafi nahe | 'कारण गुन्ह्याला माफी नाही'मध्ये आस्ताद काळेची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

'कारण गुन्ह्याला माफी नाही'मध्ये आस्ताद काळेची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ ही नवी थरारक मालिका  प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्याची झलक प्रेक्षकांना आवडली आहे. या मालिकेत प्रेक्षकांचे आवडते इन्स्पेक्टर भोसले आणि जमदाडे आपल्याला निराळ्या अंदाजात दिसणार आहेत. तर अभिनेत्री अश्विनी कासारदेखील या मालिकेतून पुनरागमन करणार आहे. या मालिकेत ती  पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे तिच्यासोबत रुपल नंददेखील या मालिकेत स्क्रीन शेअर करणार असून आता अभिनेता आस्ताद काळेदेखील या मालिकेचा भाग झाला आहे.

आस्ताद काळे नेहमी निरनिराळ्या धाटणीच्या व्यक्तिरेखा साकारताना आपल्याला दिसतो. 'कारण गुन्ह्याला माफी नाही' या मालिकेत आस्ताद एका नेत्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सुहास साटम असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव असून आता मालिकेत त्याच्या येण्याने कथानक काय वेगळे वळण घेणार? भोसले आणि जमदाडे यांच्या कामात काय भर पडणार का ? हे पाहण्याजोगे असणार आहे. 

'कारण गुन्ह्याला माफी नाही' मालिकेत कलाकारांची चांगली फळी प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. त्यात आता आस्ताद काळेच्या येण्याने मालिकेत एक वेगळी रंगत पाहायला मिळेल. एकापेक्षा एक वरचढ कलाकार एकाच वेळेला जेव्हा एकाच मालिकेत दिसतील, तेव्हा 'कारण गुन्ह्याला माफी नाही' या थरारक मालिकेत जे वेगळेपण येईल ते पाहणे प्रेक्षकांसाठी नक्कीच मजेशीर असेल.
 

Web Title: Astad Kales entry in karan gunhyala mafi nahe