पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली अश्विनी महांगडेची आई; संस्कारांची शिदोरी देणाऱ्या माऊलीला पाहिलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 06:19 PM2024-02-09T18:19:57+5:302024-02-09T18:21:03+5:30

Ashwini Mahangade: हा फोटो पाहिल्यानंतर अश्विनी हुबेहूब आपल्या आईची कार्बन कॉपी असल्याचं लक्षात येतं.

Ashwini Mahangade share her mother photo on first time | पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली अश्विनी महांगडेची आई; संस्कारांची शिदोरी देणाऱ्या माऊलीला पाहिलंय का?

पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली अश्विनी महांगडेची आई; संस्कारांची शिदोरी देणाऱ्या माऊलीला पाहिलंय का?

छोट्या पडद्यावर गाजलेलं नाव म्हणजे अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं करणारी अश्विनी आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नाटक, मालिका आणि सिनेमा अशा तीनही माध्यमांमध्ये तिने तिची छाप उमटवली आहे. विशेष म्हणजे खऱ्या आयुष्यात अश्विनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वागत असून तिच्या वागण्यातून कायम समाजाप्रतीचं प्रेम दिसून येतं. त्यामुळे तिच्यावर हे उत्तम संस्कार करणाऱ्या तिच्या आई-वडिलांचं कायम कौतुक केलं जातं. विशेष म्हणजे पहिल्यांदाच अश्विनीने तिच्या आईचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेली अश्विनी काम तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील काही घडामोडी, किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात अनेकदा ती तिच्या कुटुंबाविषयी वा कुटुंबियांविषयी सुद्धा व्यक्त होत असते. यावेळी तिने तिच्या आई आणि मावशीचा फोटो शेअर केला आहे. सोबतच तिच्या जडणघडणीमध्ये त्यांचा कसा मोलाचा वाटा आहे हे सुद्धा सांगितलं आहे.

"माझी मम्मी आणि माझी मावशी.....एकीने कायम विद्या जपायला शिकवले आणि दुसरी कायम आमच्यासाठी छाया झाली..बहिणी बहिणींनी रुसावे, फुगावे, भांडणही करावे पण एकमेकींचा हात कधीच सोडू नये हे आम्ही सगळ्या बहिणी या दोघींकडून शिकलो.एकमेकींच्या दुःखात कायम सोबत राहणाऱ्या अशा या गोड बहिणी..," असं कॅप्शन देत अश्विनीने हा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, हा फोटो पाहिल्यानंतर अश्विनी हुबेहूब आपल्या आईची कार्बन कॉपी असल्याचं लक्षात येतं. तसंच लेक लोकप्रिय अभिनेत्री असूनही त्यांनी त्यांचा साधेपणा जपला आहे. अश्विनी सध्या आई कुठे काय करते या मालिकेत काम करत आहे.
 

Web Title: Ashwini Mahangade share her mother photo on first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.