अविनाश नारकरांच्या डान्सपुढे अश्विनी झाली फेल; पाहा त्यांचा भन्नाट डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 16:00 IST2023-07-11T15:59:38+5:302023-07-11T16:00:27+5:30
Avinash Narkar: अविनाश नारकर बऱ्याचदा त्यांच्या को स्टार्ससोबतचे डान्स व्हिडीओ शेअर करत असतात.

अविनाश नारकरांच्या डान्सपुढे अश्विनी झाली फेल; पाहा त्यांचा भन्नाट डान्स
मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेता अविनाश नारकर साऱ्यांनाच ठावूक आहे. उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणाऱ्या अविनाश यांना डान्सचीही तितकीच आवड आहे. सोशल मीडियावर कोणताही नवा ट्रेंड आला की ते आवर्जुन तो फॉलो करतात. यात नुकताच त्यांनी नवा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
अविनाश नारकर बऱ्याचदा त्यांच्या को स्टार्ससोबतचे डान्स व्हिडीओ शेअर करत असतात. किंवा, काही वेळा ते सोलो डान्सचे रिल्सही करतात. यात सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री अश्विनी कासार हिने नवा ट्रेंड फॉलो केला आहे.
Kindi Chale या ट्रेंडिंग हिमाचली गाण्यावर त्यांनी डान्स केला आहे. यावेळी अश्विनी आणि अविनाश यांनी बिनधास्तपणे डान्स केला. त्यामुळे त्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.