अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 10:58 IST2024-11-07T10:56:38+5:302024-11-07T10:58:27+5:30

अशोक सराफ यांच्या अशोक मा.मा. या नव्या मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्री पुन्हा कलर्स मराठीवर कमबॅक करायला सज्ज आहे.

ashok saraf new serial ashok mama actress rasika vakharkar playing lead role | अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला

अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला

सध्या टीव्ही इंडस्ट्रीत 'अशोक मा.मा.' या एका मालिकेची खूप चर्चा आहे. बिग बॉस मराठी ५ च्या वेळेस या मालिकेचा प्रोमो लॉंच करण्यात आला होता. या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामा टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक करत आहेत. अत्यंत शिस्तप्रिय काटेकोरपणे वागणारे अशोक मामा या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. तसेच या मालिकेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे 'कलर्स मराठी'च्याच एका गाजलेल्या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री या मालिकेत कमबॅक करायला सज्ज आहे. त्याविषयीचा प्रोमो रिलीज झालाय.

ही अभिनेत्री दिसणार अशोक सराफ यांच्यासोबत

 'पिरतीचा वनवा उरी पेटला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली सावी म्हणजेच रसिका वाखारकरदेखील 'अशोक मा.मा' या मालिकेत एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळेल. समोर आलेल्या प्रोमोमधील रसिका वाखरकरच्या अंदाजाने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. याशिवाय अभिनेता लोकेश गुप्ते आणि अभिनेत्री चैत्राली गुप्ते यांची मुलगी शुभवी या मालिकेत काम करताना दिसणार असल्याने प्रेक्षकांमध्ये सध्या मालिकेची चर्चा आहे.


रसिका वाखारकरचं स्वप्न झालं पूर्ण

 'अशोक मा.मा.' या मालिकेबद्दल बोलताना रसिका म्हणाली ,"पिरतीचा वनवा उरी पेटला' ही आमची मालिका आणि माझं काम अशोक मामांना आवडायचं. पण आता 'अशोक मा.मा' या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामांसोबत काम करण्याचं माझं स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. भैरवी हे पात्र मी साकारावं यासाठी मामादेखील खूप आग्रही होते. मामांसोबत कॅमेरा शेअर करताना एक जबाबदारीची जाणीव होते."

रसिका पुढे म्हणाली"मामा समुद्रासारखे सगळ्यांना सामावून घेणारे आहेत. सेटवर त्यांनी अगदी मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण केलं आहे. मामा आमच्या वयाचे होऊनच सेटवर वावरतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना कसलंही दडपण येत नाही. मामांसोबत काम करणं हे माझ्यासाठी खूप काही शिकवणारं आहे. इतक्या मोठ्या कलाकाराच्या सानिध्यात आता आपल्याला राहता येणार आहे हीच माझ्यासाठी खूप भारी गोष्ट आहे". २५ नोव्हेंबरपासून रात्री ८.३० 'अशोक मा.मा.' ही मालिका कलर्स मराठीवर पाहायला मिळेल.

Web Title: ashok saraf new serial ashok mama actress rasika vakharkar playing lead role