अशोक सराफ निर्मिती सावंत यांना 'या' नावाने हाक मारतात, अभिनेत्रीने सांगितला मजेशीर किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 19:01 IST2024-07-18T19:01:23+5:302024-07-18T19:01:23+5:30

निर्मिती सावंत यांनी अशोक सराफ त्यांना कोणत्या नावाने हाक मारतात हा मजेशीर प्रसंग सांगितला आहे (ashok saraf, nirmiti sawant)

Ashok Saraf calls actress nirmiti Sawant by this name funny incident shared | अशोक सराफ निर्मिती सावंत यांना 'या' नावाने हाक मारतात, अभिनेत्रीने सांगितला मजेशीर किस्सा

अशोक सराफ निर्मिती सावंत यांना 'या' नावाने हाक मारतात, अभिनेत्रीने सांगितला मजेशीर किस्सा

निर्मिती सावंत या महाराष्ट्राच्या 'कॉमेडी क्वीन' म्हणून ओळखल्या जातात. निर्मिती यांचा विनोदाचा अफलातून टायमिंग हा वाखाणण्याजोगा आहे, असं म्हटल्यास वावगं ठरु नये. निर्मिती सावंत यांची एका कलाकाराशी भन्नाट केमिस्ट्री रंगते तो कलाकार म्हणजे अशोक सराफ. निर्मिती आणि अशोक सराफ हे गेल्या अनेक वर्षांपासून रंगभूमीवर 'व्हॅक्यूम क्लीनर' नाटकातून अभिनय करत आहेत. 'लोकमत फिल्मी'शी बोलताना निर्मिती यांनी त्यांचा अभिनय प्रवास उलगडला. त्यावेळी अशोक सराफ निर्मिती यांना एका खास नावाने हाक मारतात हा मजेशीर प्रसंग त्यांनी सांगितला.

 अशोक सराफ या खास नावाने निर्मिती यांना मारतात हाक

निर्मिती ताईंनी मुलाखतीत याविषयी सांगितलं की, "आमच्या व्हॅक्यूम क्लीनर नाटकाचा पहिला इंटरव्ह्यू घ्यायला एक मुलगी आली होती. त्यावेळी मुलाखतीत अशोकमामा म्हणाले, 'चिन्मयचं नाटक मी वाचलं. मी त्याने लिहिलेलं सर्व बघितलं. मग मला कळलं की ही काम करतेय.' त्यांना माझं नाव आठवेना.  मामा मला कधीही निर्मिती किंवा मधू म्हणत नाहीत. ते मला जाडी म्हणतात. निवेदिता मला मधू म्हणतात. मामा मला जाडीच म्हणतात. मामांना म्हणाले मी, 'आता काय होणार तुमचं तुम्हाला माझं नाव पाठ करावं लागणार.' तेव्हा ते म्हणाले, 'अगं हो माझं झालं ना मगाशी तसं.' त्यांनी माझं नाव पाठ केलं पण मला जाडीच म्हणतात. फार कमी लोकांना इंडस्ट्रीतील मामांची ही बाजू माहीत आहे. आम्ही सुदैवी आहोत की आम्हाला मामांची अशीही बाजू माहीत आहे."

अशोक सराफ खूप मस्ती करतात: निर्मिती सावंत

निर्मिती सावंत पुढे म्हणतात, "अभिनेता म्हणून अशोक सराफ ग्रेट आहेतच. त्याबद्दल मी काय बोलणार! आमच्या व्हॅक्यूम क्लीनरच्या प्रयोगाला अनेकदा इंडस्ट्रीतील लोक येतात. आता ५ वर्ष झाली आमच्या नाटकाला. ही खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा इंडस्ट्रीतील लोक येतात ना तेव्हा ते आम्हाला म्हणतात, 'मामा एवढे कसे मिक्स झाले तुमच्यात.' मामांना मस्ती करताना, गप्पा मारताना बघितल्यावर सगळे आश्चर्यचकित होतात. कारण अनेकांनी त्यांना गंभीर बघितलंय. इतकी मस्ती करतात ते, त्यांना प्रयोग करण्याआधी मी सांगते मामा एनर्जी करून राखून ठेवा. त्यांनी आयुष्यात कोणाला त्यांचं मानलं ना की त्या माणसाला समजतं की मामा किती मस्तीखोर आहेत."
 

Web Title: Ashok Saraf calls actress nirmiti Sawant by this name funny incident shared