Video: आर्या जाधवची अमरावतीत रॅली, सादर केलं रॅप; चाहत्यांचा तुफान प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 10:14 IST2024-09-18T10:11:36+5:302024-09-18T10:14:36+5:30

Bigg Boss Marathi Season 5: आर्या घराबाहेर जरी आली असली तरी तिला सर्वचजण सपोर्ट करत आहेत.

Arya Jadhao rally fans meet up in Amravati after coming out of Bigg Boss Marathi house | Video: आर्या जाधवची अमरावतीत रॅली, सादर केलं रॅप; चाहत्यांचा तुफान प्रतिसाद

Video: आर्या जाधवची अमरावतीत रॅली, सादर केलं रॅप; चाहत्यांचा तुफान प्रतिसाद

बिग बॉस मराठीच्या पाचव्या (Bigg Boss Marathi Season 5) पर्वात यावेळी वेगळीच गोष्ट घडली. अमरावतीच्या आर्या जाधवने (Aarya Jadhao) कॅप्टन्सी टाक्सदरम्यान निक्की तांबोळीच्या थेट कानाखालीच मारली. घराचा मूलभूत नियमच मोडल्याने आर्याला बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखवला. अशा प्रकारे निष्कासित झाल्यानंतरही आर्याला प्रेक्षकांचं प्रचंड पाठिंबा मिळताना दिसतोय. घरातून बाहेर येताच ती अमरावतीला गेली. काल तिच्यासाठी खास रॅली काढण्यात आली होती ज्यामध्ये अनेक चाहते सहभागी झाले. 

आर्या जाधवने घरातून बाहेर आल्यावर दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम लाईव्ह केले होते. यात तिने एक रॅप सादर करत निक्कीवर निशाणा साधला. तसंच चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. तर काल आर्याने अमरावतीतील 'विदर्भाचा राजा'ला भेट दिली. यावेळी तिची रॅलीही काढण्यात आली. आर्या कारच्या रुफमधून बाहेर येत सर्व चाहत्यांसोबत सेल्फीही काढताना दिसली.  अनेक चाहत्यांनी तिच्या रॅलीत उपस्थित राहून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. काही चाहते तर भावूकही झाले. आर्याने हे सर्व फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. 


एक चाहती तर तिला भेटून भावूक झालेली दिसली. अक्षरश: रडायला लागली. आर्याने तिच्याशी छानप्रकारे संवाद साधला. रडायचं नाही लढायचं हे माझ्याकडून शिकली नाहीस का? असंही आर्याने तिला विचारलं. तिची गळाभेट घेतली. 'तुम्ही सर्व चाहते माझे कुटुंबच आहात. तुमचं प्रेम पाहून मी भारावले आहे. मी तुमची आर्या bro. तुमचं प्रेमच माझ्यासाठी ट्रॉफी आहे.' असं कॅप्शन तिने लिहिलं.


आर्या घराबाहेर जरी आली असली तरी तिला सर्वचजण सपोर्ट करत आहेत. 'एकच कशाला मारली निक्कीच्या अजून २-३ कानाखाली मारायच्या होत्या' असं म्हणत तिला महाराष्ट्र पाठिंबा देतोय. 'तू गेल्यापासून बिग बॉस बघणं सोडून दिलं' अशीही कमेंट एकाने केली आहे. 

Web Title: Arya Jadhao rally fans meet up in Amravati after coming out of Bigg Boss Marathi house