आई कुठे काय करते'मध्ये अखेर अरुंधतीने घेतला घर सोडण्याचा निर्णय, कोण आहे याला कारणीभूत संजना कि अनिरुद्ध?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 18:36 IST2022-02-12T16:48:32+5:302022-02-12T18:36:31+5:30

Aai Kuthe Kay Karte: अरुंधती सर्वांना आपलीशी वाटते. ती प्रत्येकाच्या घरातील जणू सदस्य बनली आहे. मात्र आता याच अरुंधतीवर घर सोडण्याची वेळ आली आहे.

' Arundhati decided to leave the house in aai kuthe kay karte serial | आई कुठे काय करते'मध्ये अखेर अरुंधतीने घेतला घर सोडण्याचा निर्णय, कोण आहे याला कारणीभूत संजना कि अनिरुद्ध?

आई कुठे काय करते'मध्ये अखेर अरुंधतीने घेतला घर सोडण्याचा निर्णय, कोण आहे याला कारणीभूत संजना कि अनिरुद्ध?

आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ आहे. प्रेक्षक या मालिकेबद्दल आणि त्यातील कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. या मालिकेतील आई म्हणजेच अरुंधती सर्वांना आपलीशी वाटते. ती प्रत्येकाच्या घरातील जणू सदस्य बनली आहे. मात्र आता याच अरुंधतीवर घर सोडण्याची वेळ आली आहे. 

 अरुंधती आणि आशुतोष रस्ता बंद असल्यामुळे त्यांना मुंबईत येता आले नाही. त्यामुळे तिथे एकाच्या घरी थांबतात.  तर दुसरीकडे अरुंधती आशुतोष सोबत एकटी अलिबागला गेली म्हणून अनिरुद्धचा जळफळाट होत असतो. त्यात आता रात्री पण ती त्याच्यासोबत असणार म्हटल्यावर त्याचा संताप अनावर होतो. त्यामुळे तो खूप अस्वस्थ होतो. अरुंधती कुठे थांबलीय ते घरी कळवते. तिथला नंबर घरच्यांना देते. कारण तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. अनिरुद्ध खूपच अवस्थ होतो आणि तो त्या लँडलाइनवर कॉल करतो आणि अरुंधतीबद्दल विचारतो. त्या घरातला एक मुलगा फोनवर अनिरुद्धला सांगतो की अंकल आँटी आताच झोपायला गेले. हे ऐकून अनिरुद्धचा संताप अनावर होतो.

 अरुंधती अलिबागवरुन परतल्यानंतर अनिरुद्ध पुन्हा सगळ्यांसमोर तिच्याशी वाद घालतो. तो इथंवरचं थांबत नाही तर तिच्या चारित्र्यावरुन देखील संशय घेतो. यानंतर अरुंधती घर सोडण्याचा निर्णय घेते. अरुंधतीला घर सोडण्यापासून तिला कोण थांबवणार का?, की अरुंधती आपल्या घर सोडण्याच्या निर्णयावर ठाम राहणार हे पाहणं कमालीचं ठरणार आहे.  

Web Title: ' Arundhati decided to leave the house in aai kuthe kay karte serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.