गौतमीच्या घरी झालं चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; व्हिडीओ पाहून तुम्ही पडाल त्याच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 17:59 IST2022-01-25T17:57:13+5:302022-01-25T17:59:42+5:30
Gutami deshpande: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या गौतमीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून यात तिने घरी आलेल्या एका नव्या पाहुण्याची ओळख करुन दिली आहे.

गौतमीच्या घरी झालं चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; व्हिडीओ पाहून तुम्ही पडाल त्याच्या प्रेमात
'माझा होशील ना', 'सारे तुझ्याच साठी' या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे. अभिनेत्री मृण्यमी देशपांडेची धाकटी बहीण असलेल्या गौतमीने आपल्या अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच आज अनेक तरुणांच्या गळ्यात ताईत म्हणूनही ती ओळखली जाते. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या गौतमीच्या घरी नुकत्याच एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.याविषयी एक व्हिडीओ शेअर करुन तिने माहिती दिली आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या गौतमीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या घरी आलेल्या एका नव्या पाहुण्याची ओळख तिने चाहत्यांना करुन दिली आहे. तसंच 'वेलकम बेबी गर्ल' असं कॅप्शनही दिलं आहे.
दरम्यान, गौतमीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये हा नवा पाहुणा म्हणजे कुत्र्याचं एक गोंडस पिल्लू आहे. या व्हिडीओमध्ये तिने त्या नव्या मित्राची ओळख करुन दिली आहे. तसंच या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला तारे जमीनपर या चित्रपटातील गाणं प्ले असल्याचं ऐकू येत आहे. त्यामुळे सध्या गौतमीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.