Bigg Boss Marathi 2: अरे बापरे ! घरात कोणी म्हटले बिचुकलेंना भुंगा ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 14:16 IST2019-08-16T14:16:41+5:302019-08-16T14:16:48+5:30
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्य कधी घरातील कॅमेरा तर कधी एकमेकांना वेगवेगळी नावे ठेवत असतात.

Bigg Boss Marathi 2: अरे बापरे ! घरात कोणी म्हटले बिचुकलेंना भुंगा ?
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्य कधी घरातील कॅमेरा तर कधी एकमेकांना वेगवेगळी नावे ठेवत असतात. ही नाव त्यांच्या वागणुकीनुसार, कधी त्यांच्या बोलण्याच्या पध्दतीवरून तर कधी त्याच्या स्वभावरून ठेवलेली असतात. आज अभिजीत बिचुकले यांना घरातील सदस्यांनी सहमताने एक नाव ठेवले आहे ... अभिजीत बिचुकले त्यांच्या बोलण्याच्या स्टाईलवरून, घरातील वागणुकीवरून नेहेमी चर्चेत असतात... आरोह आज बोलताना सांगणार आहे सहमताने तुम्हाला एक नाव ठेवले आहे त्यावर शिवानी म्हणाली कानखजुरा का? त्यावर आरोह म्हणाला नाही “भुंगा”... सगळ्यांनाच हे नाव पटले आहे... आता अभिजीत बिचुकले यावर किती सहमत आहेत... त्यांचे यावर काय म्हणणे असेल ?
अभिजीत बिचुकलेंचा वीणाबरोबर चांगलच वाद झाला... मेघा, शिवानी आणि वीणाने त्यांना खडसावले की, यापुढे कोणाची कृपयावरून लायकी काढू नका... शिवानीच्या सांगण्यावरून अभिजीत बिचुकले यांनी वीणाची माफी मागितली परंतु वीणाने सांगितले यापुढे मी तुमच्याशी नाही बोलणार...