अरमान मलिकने दिव्यांकासाठी गायले 'हे' गाणं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 19:00 IST2019-03-02T19:00:00+5:302019-03-02T19:00:00+5:30
गायक अदनान सामी, हर्षदीप कौर, पॉप गाण्यांची सम्राज्ञी कनिका कपूर आणि अरमान मलिक हे प्रशिक्षकची (परीक्षक) जबाबदारी पार पाडत आहेत.

अरमान मलिकने दिव्यांकासाठी गायले 'हे' गाणं
खास सिंगिंग रिॲलिटी शो स्टारप्लसवरील ‘दि व्हॉईस’ने आपल्या एक से एक परीक्षक आणि उत्तमोत्तम स्पर्धकांच्या जोरावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गायक अदनान सामी, हर्षदीप कौर, पॉप गाण्यांची सम्राज्ञी कनिका कपूर आणि अरमान मलिक हे प्रशिक्षकची (परीक्षक) जबाबदारी पार पाडत आहेत. शोच्या सुरुवातीपासून अरमान या शोच्या होस्टला म्हणजेच दिव्यांकाला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करतोय. अरमानने दिव्यांकासाठी एक गाणं देखील गायले.
सूत्रांनी सांगितले, “सेटवरील सर्वांनाचा ठाऊक आहे की अरमान दिव्यांकासोबत फ्लर्टिंग करतो पण ती सगळी मस्ती असते. ह्यावेळेला मात्र अरमानने तिच्यासाठी गाणं गायले. त्याने तिच्यासाठी पहली नजर में हे गाणं गायले आणि त्यांनी त्यावर डान्सही केली दिव्यांकानेही त्याला प्रतिसाद दिला.”
हा शो सुरु होण्याआधी ए.आर.रहमान यांनी अरमान मलिकची स्तुती केली होती. अरमानबदल बोलताना रहमान म्हणाला होता की, , “अरमान मलिक हा आजच्या पिढीतील सर्वोत्कृष्ट संगीतकारांपैकी एक आहे. त्याच्या गुणांना तोडच नाही आणि तो इतका वैविध्यपूर्ण आहे की तो कोणत्याही प्रकारच्या गाण्याला पूर्ण न्याय देऊ शकतो. तो खरोखरच आजच्या तरुणांचा संगीत आयकॉन आहे.”