धनश्रीने युजवेंद्रसोबतच्या घटस्फोटाचा 'राइज अँड फॉल'मध्ये वापर केला? अर्जुन बिजलानी म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 11:33 IST2025-10-18T11:31:11+5:302025-10-18T11:33:02+5:30

अर्जुन बिजलानीचं धनश्री वर्माबद्दल काय मत आहे?

arjun bijlani winner of rise and fall reveals whether dhanashree verma used fact of divorce with yuzvendra while playing game | धनश्रीने युजवेंद्रसोबतच्या घटस्फोटाचा 'राइज अँड फॉल'मध्ये वापर केला? अर्जुन बिजलानी म्हणाला...

धनश्रीने युजवेंद्रसोबतच्या घटस्फोटाचा 'राइज अँड फॉल'मध्ये वापर केला? अर्जुन बिजलानी म्हणाला...

'राइज अँड फॉल' या रिएलिटी शोचा काल अंतिम सोहळा झाला. टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी शोचा विजेचा ठरला. 'शार्क टँक' फेम अशनीर ग्रोवरने या शोचं सूत्रसंचालन केलं होत. शोमध्ये अरबाज पटेल, कीकू शारदा, आदित्य नारायण, कुब्रा सैत, धनश्री वर्मा असे काही सेलिब्रिटी सहभागी झाले होते. दरम्यान धनश्रीला अनेकदा युजवेंद्र चहलसोबतच्याघटस्फोटावर प्रश्न विचारण्यात आले. तिने अनेक खुलासेही केले तसंच चहलवर काही आरोपही लावले. धनश्रीने शोमध्ये याचा फायदा घेतला का? असा प्रश्न विचारला असता अर्जुन बिजलानीने याचं उत्तर दिलं आहे.

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना धनश्री वर्माबद्दल अर्जुन बिजलानी म्हणाला, "ती रडत होती आणि तिच्या आधीच्या आयुष्याबद्दल काही गोष्टी सांगत होती. मी तिचं ऐकत होतो आणि शांतपणे माझं मत सांगत होतो. ही फक्त नॉर्मल चर्चा होती. हा माझ्या खेळाचा भाग नव्हता. मी उलट तिला धीर देत होतो. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यावर मोकळेपणाने बोलली. मी हे कधीच करु शकलो नसतो."

तो पुढे म्हणाला, "स्पर्धेच्या वातावरणात आपणही माणूस आहोत हे लोक विसरतात. कोणाबद्दल काळजी दाखवणं याचा अर्थ आपण कमजोर झालो असं होत नाही. ती खूप काही बोलत होती. मुलांच्या पार्ट्यांबद्दलही बोलली. मला कळत नाही मुलांचं हँगआऊट करणं आणि पार्टी करणं हे इतकं टॅबू का आहे? जर ती खोटं बोलत असेल किंवा खेळासाठी असं करत असेल तर हे मला कसं कळणार? मी तर फक्त तिच्याबद्दल आदर दाखवत होतो."

Web Title: arjun bijlani winner of rise and fall reveals whether dhanashree verma used fact of divorce with yuzvendra while playing game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.