"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 12:24 IST2025-08-22T12:22:50+5:302025-08-22T12:24:16+5:30
अर्जुन बिजलानीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणतो...

"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीने(Arjun Bijlani) सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ पाहून चाहत्यांना त्याची चिंता वाटत आहे. अर्जुनला त्याची पत्नी आणि मुलगा खूपच जवळचे आहेत. मात्र तो आता वेगळा रस्ता निवडत असल्याचं त्याने सांगितलं आहे. यावरुन अर्जुनने असा काय मोठा निर्णय घेतलाय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अर्जुन आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट तर होत नाहीये ना अशीही एक चर्चा सुरु झाली आहे.
अर्जुन बिजलानीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणतो, "हॅलो मित्रांनो, जेव्हाही आयुष्यात काही घडतं तेव्हा मी ते तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करतो. आताही खूप काही घडलंय ते मला तुम्हाला सांगावंसं वाटत आहे. आधी तर मला आणि माझ्या कुटुंबाला कायम पाठिंबा दिल्याबद्दल तुमचे आभार. तुम्हाला माहितच आहे की माझ्यासाठी माझं कुटुंब किती महत्वाचं आहे. विशेषत: माझी बायको आणि माझा मुलगा. माझ्या चढ उतारात ते कायम माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. पण काही कारणांमुळे मला एक वेगळा रस्ता निवडावा लागत आहे. मी असं कधी करेन असं मला वाटलंही नव्हतं. तुम्हाला दुसरीकडून कुठून कळावं त्याआधीच मी सांगत आहे. कधी कधी आयुष्यात अशी परिस्थिती येते जेव्हा तुम्हाला कठीण निर्णय घ्यावे लागतात. मी आजवरचा घेतलेला हा सर्वात कठीण निर्णय आहे. काहीही तर्क लावू नका. मी लवकरच स्पष्ट काय ते सांगेन."\
अर्जुनच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत विविध अंदाज लावले आहेत. अर्जुन 'बिग बॉस १९'मध्ये जातोय का असं अनेकांनी विचारलं आहे. तर काही जणांनी 'राईझ अँड फॉल' या नवीन शोचं नाव घेतलं आहे. तसंच काही चाहत्यांनी अर्जुनविषयी चिंता व्यक्त केली आहे. अर्जुनचा घटस्फोट तर होत नाहीये ना? असाही अनेकांनी अंदाज लावला आहे. तसंच हा पब्लिसिटी स्टंटही असू शकतो अशाही कमेंट्स आल्या आहेत.