"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 17:14 IST2025-08-26T17:14:06+5:302025-08-26T17:14:53+5:30

अरबाज निक्कीने एकमेकांसाठी मागितली 'ही' इच्छा

arbaz patel and nikki tamboli celebrating ganeshotsav together couple shared some secrets | "हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

'बिग बॉस मराठी ५' मुळे निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अरबाज पटेल (Arbaz Patel) हे कपल घराघरात पोहोचलं. बिग बॉस संपल्यानंतरही दोघांची जोडी आजही चर्चेचा विषय असते. या जोडीचे अनेक चाहतेही आहेत. नुकताच निक्कीने वाढदिवस साजरा केला. अरबाजसोबत ती दुबईत होती. तर आता ती आपल्या मुंबईतील गरी गणपती बाप्पाचं स्वागत करणार आहे. यासाठी ती अरबाजसोबत मिळून डेकोरेशन करत आहे. नुकतंच एका मुलाखतीत निक्की आणि अरबाजने गणेशोत्सवाच्या त्यांच्या आठवणी शेअर केल्या.

निक्की तांबोळीच्या मुंबईतील घरी अरबाजसोबत मिळून तिने गणपती बाप्पासाठी डेकोरेशन केलं. 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत निक्की म्हणाली, "मी तर गणपती बाप्पााच्या स्वागतासाठी नेहमीच आतुर असते. लहानपणी सोसायटीत गणपती बाप्पाचं आगमन व्हायचं. तेव्हा वर्गणी गोळा करण्यात मी कायम पुढे असायचे. मी तर रात्रभर जागी राहायचे. आम्ही सगळे मिळून सोसायटीतील मंदिरात डेकोरेशन करायचो. गणेशोत्सव आहे म्हणून आईबाबाही मला अभ्यास सोडून जाऊ द्यायचे. मला अभ्यासात तेव्हा रसच नसायचा. तसंच गणपती डान्स, ढोल हे सगळं माझं आवडतं आहे."

गणेशोत्सवाच्या आठवण सांगताना अरबाज म्हणाला, "माझ्या लहानपणी आम्ही आमच्या गल्लीत गणेशोत्सव, होळी, दिवाळी, ईद सगळं एकत्र साजरे करायचो. आता सगळं बदललं आहे."

अरबाजला गणेशोत्सवाच्या कोणत्या गोष्टी शिकवणार यावर निक्की म्हणाली, "अरबाज जिथे लहानाचा मोठा झाला आहे तिथे गणपती आरती तर होतच होती. पण यावेळी तो माझ्याकडून आरती शिकणार आहे. कारण मला सगळ्या आरत्या पाठ आहेत. मला कधीकधी रात्री झोप येत नसेल तेव्हा मी हनुमान चालीसा म्हणते. मला झोप येत नाही तेव्हा अरबाजच आता मला प्रत्येक वेळी सांगतो की तू हनुमान चालीसा म्हण. मला त्याचा तो सल्ला ऐकून आश्चर्यच वाटलं होतं." तसंच एकमेकांसाठी बाप्पाकडे काय मागणार? यावर निक्की म्हणाली, 'एवढंच मागेन की आम्हाला दोघांना नजर नको लागू दे'. 

Web Title: arbaz patel and nikki tamboli celebrating ganeshotsav together couple shared some secrets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.