अरबाज अन् सोहेल खानने उडवली स्वत:च्याच घटस्फोटाची खिल्ली, स्पर्धकांनाही हसू आवरेना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 10:13 AM2023-10-30T10:13:52+5:302023-10-30T10:14:44+5:30

सोहेल म्हणतो,'नवरा बायकोमधलं भांडण सोडवण्याचा आपल्याकडे काही उपाय आहे का?'

Arbaaz and Sohail Khan in Bigg Boss 17 makes fun of their own marriage contastants also laughed out loud | अरबाज अन् सोहेल खानने उडवली स्वत:च्याच घटस्फोटाची खिल्ली, स्पर्धकांनाही हसू आवरेना

अरबाज अन् सोहेल खानने उडवली स्वत:च्याच घटस्फोटाची खिल्ली, स्पर्धकांनाही हसू आवरेना

'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) सध्या टीव्हीवर जबरदस्त मनोरंजन करत आहे. कपल्समधील भांडणं, सलमान खानचा 'वीकेंड का वार' यामुळे धमाल येत आहे. नुकतंच सलमान खानचे दोन्ही भाऊ अरबाज खान (Arbaaz Khan) आणि सोहेल खान (Sohail Khan) यांनीही बिग बॉसमध्ये पाहुणे म्हणून हजेरी लावली. दोघांनी स्पर्धकांशी मस्त गप्पा मारल्या आणि त्यांच्यासोबत स्वत:चीही खिल्ली उडवली. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

अरबाज आणि सोहेल बिग बॉसच्या मंचावर एन्ट्री घेतात. लोकप्रिय 'जस्ट चिल' गाण्यावर ते ठेका धरतात. सर्वात स्ट्राँग स्पर्धक कोण आहे असं सोहेल वितारतो तर अरबाज म्हणतो,'स्ट्राँग तर माहित नाही बांधलेला स्पर्धक माहित आहे, ऐश्वर्या नीलने तुला बांधून ठेवलं आहे.' यानंतर सोहेल म्हणतो,'नवरा बायकोमधलं भांडण सोडवण्याचा आपल्याकडे काही उपाय आहे का?' यावर अरबाज आश्चर्याने म्हणतो,'आपल्याकडे?' तेव्हा सोहेल गंमतीत म्हणतो, 'आमच्या दोघांचं सध्याचं स्टेटस पाहिलं तर आम्ही काही टीप दिलीही नाही पाहिजे'. यानंतर एकच हशा पिकला.

अरबाज खान आणि सोहेल खान दोघांचा घटस्फोट झाला आहे. दोघंही आता सिंगल आयुष्य जगत आहेत. पतीपासून वेगळे झाल्यानंतर मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आली. तर सीमा सजदेह सध्या सिंगल आहे. 

Web Title: Arbaaz and Sohail Khan in Bigg Boss 17 makes fun of their own marriage contastants also laughed out loud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.