समीर चौघुलेने सिडनीतील फोटो शेअर करताच नेटकरी म्हणाले- परत या मिरारोडला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 16:52 IST2022-07-23T16:47:11+5:302022-07-23T16:52:43+5:30
Samir Choughule: समीर चौघुले सध्या सिडनीमध्ये आहे. त्याने सिडनीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करताच नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

समीर चौघुलेने सिडनीतील फोटो शेअर करताच नेटकरी म्हणाले- परत या मिरारोडला...
मराठी कलाविश्वात आज असे काही कलाकार आहेत, ज्यांनी अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे समीर चौगुले. उत्तम अभिनयशैली आणि विनोदबुद्धीमुळे हा अभिनेता आज घराघरात पोहोचला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा समीर प्रेक्षकांना त्यांच्या घरातील एक सदस्य असल्याप्रमाणेच भासतो. सध्या समीर ऑस्ट्रेलियात आहे.
सोशल मीडियावर समीर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. समीरने सध्या ऑस्ट्रलियातील सिडनीमध्ये आहे त्याने तिथले काही फोटो इनस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. हे फोटो शेअर करताना समीरने एक खास पोस्ट लिहिली आहे, शालेय मित्र विनया लाड आणि तिचा नवरा अजय लाड...मी विनयाला जवळपास 30 वर्षांनी भेटलो. आम्ही दहिसरच्या शैलेंद्र शाळेचे मित्र 3 दशकांनंतर भेटलो...माझ्यासोबत मजेत वेळ घालवल्याबद्दल आणि सिडनीतील सर्वात चविष्ट ब्रंच दिल्याबद्दल अजय आणि विनयाचे खूप खूप आभार.. समीरची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. शिवाली हे खरं आहे काय???????????, विरारचं पुढचं SYDENY का? या परत मिरारोडला एक ही EPISODE तुमच्याशिवाय शूट नाही झाला पाहीजे...मोट्टा, आपलं मरिन ड्राईव्हपण सेम आहे. अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी समीरच्या या पोस्टवर केल्या आहेत.
दरम्यान अभिनेता समीर चौगुले हा आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकदा त्याची चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे पडद्यावर वावरणारा हा कलाकार खऱ्या आयुष्यातही अत्यंत साधा आहे. त्यामुळे त्याच्या याच साधेपणामुळे त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.