स्वत:च्याच लग्नात 'शरारत' गाण्यावर थिरकली अपूर्वा नेमळेकर, पूर्वा शिंदेनेही दाखवल्या अदा; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 11:20 IST2026-02-16T11:18:30+5:302026-02-16T11:20:02+5:30
अपूर्वाच्या लग्नात पूर्वाने तिच्यासोबत बॉलिवूडच्या व्हायरल गाण्यावर ठेका धरला. 'धुरंधर'मधील 'शरारत' गाण्यावर अपूर्वा आणि पूर्वा यांनी डान्स करत सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.

स्वत:च्याच लग्नात 'शरारत' गाण्यावर थिरकली अपूर्वा नेमळेकर, पूर्वा शिंदेनेही दाखवल्या अदा; व्हिडीओ व्हायरल
मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा असलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. पहिल्या घटस्फोटानंतर अपूर्वाने आता नव्याने संसार थाटला आहे. अपूर्वाने अनुज गोवळकर याच्यासोबत सप्तपदी घेत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत अपूर्वाने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली. अपूर्वा आणि अनुज यांनी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला काही सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती.
अपूर्वाच्या लग्नात अभिनेत्री पूर्वा शिंदेही उपस्थित होती. पूर्वाने अपूर्वाच्या लग्नातील काही खास क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. अपूर्वाच्या लग्नात पूर्वाने तिच्यासोबत बॉलिवूडच्या व्हायरल गाण्यावर ठेका धरला. 'धुरंधर'मधील 'शरारत' गाण्यावर अपूर्वा आणि पूर्वा यांनी डान्स करत सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. अपूर्वाच्या लग्नातील हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
अपूर्वाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. आभास हा मालिकेतून अपूर्वाने टेलिव्हिजन विश्वात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये ती दिसली. पण, रात्रीस खेळ चाले मालिकेमुळे अपूर्वा प्रसिद्धीझोतात आली होती. तिने या मालिकेत साकारलेली शेवंता ही भूमिका प्रचंड गाजली होती. अपूर्वाने २०१४ मध्ये रोहन देशपांडेसोबत पहिलं लग्न केलं होतं. त्याआधी काही वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. तेव्हापासून अपूर्वा सिंगल होती. आता तिने नव्याने तिच्या आयुष्याला सुरुवात केली आहे.