"लग्नाचे फोटो शेअर केल्यापासून तुम्ही..."; अपूर्वा नेमळेकरने दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकल्यावर दिली पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 10:36 IST2026-02-18T10:35:04+5:302026-02-18T10:36:24+5:30

अपूर्वाने लग्नाची बातमी सर्वांसमोर शेअर करताच अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचं अभिनंदन केलं. अशातच अपूर्वाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन तिची प्रतिक्रिया दिली आहे.

apurva Nemalekar first reaction after getting married for the second time tanuj govalkar | "लग्नाचे फोटो शेअर केल्यापासून तुम्ही..."; अपूर्वा नेमळेकरने दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकल्यावर दिली पहिली प्रतिक्रिया

"लग्नाचे फोटो शेअर केल्यापासून तुम्ही..."; अपूर्वा नेमळेकरने दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकल्यावर दिली पहिली प्रतिक्रिया

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने दुसरं लग्न करुन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. काहीच चर्चा नसताना अपूर्वाने थेट लग्नाचे फोटो पोस्ट केले होते. तनुज गोवलकर हे अपूर्वाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे. अपूर्वाने लग्नाची बातमी सर्वांसमोर शेअर करताच अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचं अभिनंदन केलं. अशातच अपूर्वाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन तिची प्रतिक्रिया दिली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

अपूर्वाने मानले चाहत्यांचे आभार

अपूर्वा सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिते की, ''लग्नाचे फोटो शेअर केल्यापासून तुम्ही सर्वांनी आमच्यावर जो प्रेमाचा, आशीर्वादांचा आणि आपुलकीचा वर्षाव केला आहे, त्याने मी आणि तनुज पूर्णपणे भारावून गेलो आहोत. आमची कृतज्ञता व्यक्त करायला आमच्याकडे शब्द अपुरे पडत आहेत. हे मिलन केवळ दोन व्यक्तींचे नसून दोन हृदयांचे आहे... अशा दोन आयुष्यांचे ज्यांनी स्वतःच्या वाट्याला आलेली वादळे आणि ऊन-सावली (सुख-दुःख) पाहिली आहेत. आमचे चाहते, फॉलोअर्स, कुटुंबीय, मित्रमैत्रिणी आणि हितचिंतकांकडून मिळालेली ही अफाट सकारात्मकता पाहून आमचे मन भरून आले आहे.''


''तुमचे हे प्रेम मनात साठवून आम्ही आमच्या आयुष्याच्या या नवीन अध्यायाची सुरुवात एका कृतज्ञ भावनेने करत आहोत. आमच्या सुखाच्या क्षणांना इतक्या सुंदर आणि सन्मानपूर्वक पद्धतीने साजरे केल्याबद्दल माध्यम क्षेत्रातील (Media) आमच्या सर्व मित्रमैत्रिणींचे विशेष आभार.'', अशा शब्दांत अपूर्वाने तिच्या भावना शेअर केल्या आहेत. अपूर्वाने व्हॅलेंटाईन डेच्या मुहुर्तावर अर्थात १४ फेब्रुवारी २०२६ रोजी लग्नगाठ बांधली. 

Web Title : अपूर्वा नेमलेकरने दुसऱ्या विवाहा नंतर दिली पहिली प्रतिक्रिया

Web Summary : अपूर्वा नेमलेकरने तनुज गोवलकरसोबत दुसरा विवाह करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. तिने मिळालेल्या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि या विवाहाला दोन हृदयांचे मिलन म्हटले, ज्यांनी वादळे आणि ऊन पाहिले आहेत. तिने सर्वांचे आभार मानले.

Web Title : Apurva Nemlekar shares first reaction after second marriage

Web Summary : Apurva Nemlekar surprised fans with her second marriage to Tanuj Govalkar. She expressed gratitude for the love and blessings received, calling it a union of two hearts that have seen both storms and sunshine. She thanked everyone for their support.