New Marathi Serial : झी मराठीवर येतेय आणखी एक नवी मालिका, जाणून घ्या काय आहे नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 14:15 IST2022-07-24T14:13:36+5:302022-07-24T14:15:49+5:30
New Marathi Serial on Zee Marathi : येत्या काळात झी मराठीवरील बऱ्याच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असून नव्या मालिका सुरू होत आहेत आणि यात आणखी एका मालिकेची भर पडणार आहे....

New Marathi Serial : झी मराठीवर येतेय आणखी एक नवी मालिका, जाणून घ्या काय आहे नाव
टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी अनेक वाहिन्या नव्या नव्या मालिका घेऊन येत आहेत. आता आणखी एक नवी मालिका येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. होय, झी मराठी (Zee Marathi )या वाहिनीवर लवकरच एक मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या काळात झी मराठीवरील बऱ्याच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असून नव्या मालिका सुरू होत आहेत आणि यात आणखी एका मालिकेची भर पडणार आहे.
येत्या महिन्यात झी मराठीवर तू चालं पुढं, नवा गडी नवं राज्य या मालिका सुरू होत आहे. याशिवाय बस बाई बस आणि डान्स महाराष्ट्र डान्स हे शो सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातच आता या लिस्टमध्ये आणखी एका मालिकेची एंट्री होणार आहे. झी मराठीवरील लवकरच ‘आप्पी आमची कलेक्टर’ (Appi Amchi Collector ) नावाची नवी मालिका सुरू होणार आहे. मालिकेच मुहूर्त झाला असून शुटींगला सुरुवात झाली आहे.
वज्र प्रोडक्शननं मालिकेची निर्मिती केली आहे. मराठमोळी अभिनेत्री श्वेता शिंदेने संजय खांबे यांच्यासोबत मिळून वज्र प्रॉडक्शन सुरु केलं आहे. वज्र प्रोडक्शनने याआधीही झी मराठीवरील अनेक मालिकांची निर्मिती केली आहे. लागीर झालं जी, मिसेस मुख्यमंत्री, छोटी मालकीण यासारख्या मालिकांचा यात समावेश आहे. आता व्रज प्रॉडक्शन ‘आप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका घेऊन येत आहे.
आता नवी मालिका सुरु होणार असल्यानं आणखी कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर त्याचा खुलासा लवकरचं होईल. या नव्या मालिकेतील कलाकारांची नाव सुद्धा अद्याप गुलदस्त्यात आहेत. लवकरच त्याबद्दलही कळेलच.
येत्या 29 जुलैपासून शुक्रवार व शनिवारी रात्री 9.30 वाजता ‘बस बाई बस’ हा धम्माल शो झी मराठीवर सुरू होत आहे. यात वेगवेगळ्या महिला सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. त्यानंतर 8 ऑगस्टसून ‘नवा गडी नवे राज्य’ ही मालिका सुरू होतेय. ‘ तू चाल पुढं’ ही मालिका ही मालिका 15 ऑगस्टपासून पाहायला मिळणार आहे.