"अप्पू मां...", मालिका संपल्यानंतर अप्पीच्या आठवणीत छोटा अमोल भावुक, म्हणाला- "मला माहितीये..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 15:57 IST2025-03-18T15:54:55+5:302025-03-18T15:57:20+5:30
'अप्पी आमची कलेक्टर' मालिका संपल्यानंतर साईराजने अप्पीसाठी म्हणजेच अभिनेत्री शिवानी नाईक हिच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

"अप्पू मां...", मालिका संपल्यानंतर अप्पीच्या आठवणीत छोटा अमोल भावुक, म्हणाला- "मला माहितीये..."
छोट्या पडद्यावरील अशा मोजक्या मालिका आहेत ज्यांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. अशाच मालिकांपैकी एक म्हणजे 'अप्पी आमची कलेक्टर'. झी मराठी वाहिनीवरील या मालिकेतून छोट्याशा खेडेगावात राहणाऱ्या अप्पीचा कलेक्टर होण्यापर्यंतचा जिद्दीचा प्रवास दाखविण्यात आला. या मालिकेतून दाखवलेली एका प्रेरणादायी कलेक्टरची गोष्ट प्रेक्षकांना भावली. मात्र, या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत छोट्या अमोलची भूमिका साकारून बालकलाकार साईराज केंद्रेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. मालिकेतील अप्पी-अमोल ही मायलेकाची जोडी प्रेक्षकांना भावली होती. आता 'अप्पी आमची कलेक्टर' मालिका संपल्यानंतर साईराजने अप्पीसाठी म्हणजेच अभिनेत्री शिवानी नाईक हिच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.
साईराज केंद्रेच्या अकाऊंटवरुन शिवानीसोबतचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये त्यांचा स्पेशल बॉन्ड दिसत आहे. "अप्पू मां...❤️ मला माहितीये मी आज कुठेही असलो तरी तुझा आशिर्वाद कायम माझ्या सोबत आहे.....तु मला खूप काही शिकवलंय ते मी कधीच विसरणार नाही 🙂↔️ Miss You खूप", असं त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. या पोस्टवर कमेंट करत शिवानीने "मिस यू बबड्या" असं म्हटलं आहे.