अप्पी आमची कलेक्टर: अप्पी-अर्जुनच्या बाळाच्या जीवाला धोका?; मालिकेत येणार ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 14:44 IST2024-01-23T14:43:57+5:302024-01-23T14:44:50+5:30
Appi Aamchi Collector: अर्जुन-अप्पीच्या बाळाच्या जीवाचा धोका टळेल का?

अप्पी आमची कलेक्टर: अप्पी-अर्जुनच्या बाळाच्या जीवाला धोका?; मालिकेत येणार ट्विस्ट
छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे अप्पी आमची कलेक्टर. सध्या या मालिकेत कदम कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. अप्पी लवकरच आई होणार आहे. त्यामुळे कदम कुटुंबासह प्रेक्षक वर्गही अप्पीच्या बाळाला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, कदम कुटुंबाच्या या आनंदावर विरजन पडणार असल्याचं दिसून येत आहे.
सध्या या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोममध्ये अप्पी आणि अर्जून यांच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण होणार असल्याचं दिसून येत आहे. अलिकडेच झालेल्या भागामध्ये अप्पी नैसर्गिकरित्या तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे नुकतीच ती सरकारी रुग्णालयात अॅडमीट झाली आहे. इतकंच नाही तर अप्पी सुखरुपपणे तिच्या बाळाला जन्म सुद्धा देते. परंतु, जन्मानंतर या बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये, अप्पीने बाळाला जन्म दिल्यानंतर अर्जुन बाळाला सगळ्यात प्रथम हातात घेतो. मात्र,त्याने बाळाला घेतल्यानंतर तो काहीही हालचाल करत नाही. त्यामुळे अर्जुन घाबरुन जातो. त्यामुळे आता त्याच्या या मालिकेत काय होतं? अप्पीच़्या बाळाच्या जीवाचा धोका टळू शकेल का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.