निर्मात्याची लेक असूनही अनुपमाने घासली लोकांची खरकटी भांडी; रुपाली गांगुली स्ट्रगल स्टोरी ऐकून येईल डोळ्यात पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 14:09 IST2022-07-22T14:08:32+5:302022-07-22T14:09:14+5:30
Rupali ganguly: अनुपमा या नावाने आज घराघरात पोहोचलेली रुपाली आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. मात्र, एकेकाळी तिला अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागला होता.

निर्मात्याची लेक असूनही अनुपमाने घासली लोकांची खरकटी भांडी; रुपाली गांगुली स्ट्रगल स्टोरी ऐकून येईल डोळ्यात पाणी
रुपाली गांगुली (rupali ganguly) हे नाव सध्याच्या घडीला कोणासाठीही नवीन नाही. छोट्या पडद्यावर रुपालीने तिचा दबदबा निर्माण केला आहे. अनुपमा या नावाने आज घराघरात पोहोचलेली रुपाली आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. मात्र, एकेकाळी तिला अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागला होता. इतकंच नाही तर एक काळ असा होता ज्यावेळी चार पैशांसाठी तिला लोकांच्या घरी खरकटी भांडी घासावी लागली होती.
अलिकडेच रुपालीने एक मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या करिअरमध्ये आलेल्या चढउतार, कौटुंबिक परिस्थिती यावर भाष्य केलं. विशेष म्हणजे एका प्रसिद्ध निर्मात्याची लेक असूनही तिला आर्थिक समस्यांना सामोर जावं लागलं होतं.
"माझे वडील अनिल गांगुली प्रसिद्ध चित्रपट निर्माता होते. ते प्रचंड मेहनतीने आणि आवडीने चित्रपटांची निर्मिती करायची. त्याकाळी चित्रपटांच्या निर्मितीसाठी त्यांनी आमचं राहतं घर विकलं आणि दुर्दैवाने त्याचे लागोपाठ तीन चित्रपट फ्लॉप झाले. परिणामी, आम्ही रस्त्यावर आलो. त्यावेळी मी माझ्या करिअरकडे इतकं गांभीर्याने पाहिलं नव्हतं. त्याच काळात कास्टिक काऊंच बरंच चालायचं. त्यामुळे काही झालं तरी आपल्या प्रतिमेला धक्का लागणार नाही असं वचन मी वडिलांना दिलं होतं. त्यामुळेच कास्टिंग काऊचच्या भीतीने मी दादरमध्ये हॉटेल मॅनेजमेंट करण्यास सुरुवात केली", असं रुपाली म्हणाली.
पुढे ती म्हणते, "त्यावेळी वडिलांची प्रकृती अचानकपणे खालावली. त्यामुळे मी ज्या कॉलेजमध्ये कॅटरिंगचे धडे घेत होते त्यांच्या माध्यमातून वेटरचं कामही केलं. लोकांची खरकटी भांडीही घासली. मला तेव्हा एका तासासाठी १८० रुपये मानधन मिळत होतं. पैसे मिळावेत यासाठी मी त्याकाळात इतरही कामं केली. अभिनयदेखील करत होते."
दरम्यान, एकेकाळी पैशांसाठी वणवण करणारी रुपाली आज छोट्या पडद्यावरील महागडी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. रुपालीने साराभाई वर्सेस साराभाई, बिग बॉस, सुकन्या, दिल है की मानता नही, जिंदगी तेरी मेरी कहानी, भाभी, काव्यांजली या मालिकांमध्ये काम केलं आहे.