Video: रुपाली गांगुलीने 'कच्चा बादाम'वर केला भन्नाट डान्स; पहिल्यांदाच दिसला नवा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 15:58 IST2022-02-08T15:58:13+5:302022-02-08T15:58:43+5:30

Rupali ganguly: सोशल मीडियावर सक्रीय असलेली रुपाली अनेकदा व्हायरल होणारे नवनवीन ट्रेंड फॉलो करत असते. यात अलिकडेच तिने कच्चा बादाम या गाण्यावर एक व्हिडीओ शूट केला.

anupama fame rupali ganguly did tremendous dance on song kaccha badam video viral | Video: रुपाली गांगुलीने 'कच्चा बादाम'वर केला भन्नाट डान्स; पहिल्यांदाच दिसला नवा अंदाज

Video: रुपाली गांगुलीने 'कच्चा बादाम'वर केला भन्नाट डान्स; पहिल्यांदाच दिसला नवा अंदाज

छोट्या पडद्यावर सध्या 'अनुपमा' (anupama) ही मालिका चांगलीच गाजत आहे. या मालिकेत अभिनेत्री रुपाली गांगुली (rupali ganguly) मुख्य भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे या मालिकेमुळे रुपाली कमालीची लोकप्रिय झाली असून तिच्या जीवनातील प्रत्येक अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यामुळे रुपालीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली रुपाली अनेकदा व्हायरल होणारे नवनवीन ट्रेंड फॉलो करत असते. यात अलिकडेच तिने कच्चा बादाम या गाण्यावर एक व्हिडीओ शूट केला. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. रुपालीने तिच्या भाचासोबत हा व्हिडीओ शूट केला आहे.

'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीने स्विमिंग पूलमध्ये केलं बोल्ड फोटोशूट; नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट

दरम्यान, रुपाली पहिल्यांदाच एका नव्या अंदाजात चाहत्यांसमोर आल्यामुळे अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. सध्या रुपाली अनुपमा मालिकेत बिझी असून या मालिकेमुळे तिची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. विशेष म्हणजे या मालिकेनंतर रुपाली छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरल्याचं सांगण्यात येतं. 
 

Web Title: anupama fame rupali ganguly did tremendous dance on song kaccha badam video viral