दसऱ्याच्या मुहुर्तावर अंकिता वालावलकरने दिली आनंदाची बातमी! म्हणाली- "मी आणि कुणाल..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 15:14 IST2025-10-03T15:13:34+5:302025-10-03T15:14:04+5:30
दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर अंकिताने चाहत्यांसोबत एक गुडन्यूज शेअर केली आहे. एक नवी इनिंग अंकिताने सुरू केली आहे.

दसऱ्याच्या मुहुर्तावर अंकिता वालावलकरने दिली आनंदाची बातमी! म्हणाली- "मी आणि कुणाल..."
कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्धी मिळवलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर 'बिग बॉस मराठी'मुळे प्रसिद्धीझोतात आली. अंकिता सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांना अपडेट्स देत असते. दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर अंकिताने चाहत्यांसोबत एक गुडन्यूज शेअर केली आहे. एक नवी इनिंग अंकिताने सुरू केली आहे.
अंकिताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. अंकिता आणि तिचा पती कुणाल भगत यांनी मिळून नवं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर कोकण हार्टेड गर्लने नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. 'मड आय स्टुडिओज' असं अंकिता आणि कुणालच्या निर्मिती कंपनीचं नाव आहे. "प्रत्येक मोठ्या स्वप्नाला लागतो शुभारंभाचा क्षण…आणि तो क्षण आम्हाला मिळतोय आज, दसऱ्याच्या या मंगलदिनी मी आणि कुणाल आमचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू करत आहोत. दोन क्रिएटिव्ह डोकी एकत्र आली की भन्नाट काहीतरी घडणार हे नक्की!", असं अंकिताने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'मड आय स्टुडिओज'च्या नावाचा अर्थही तिने पोस्टमध्ये सांगितला आहे. ती म्हणते, "Mud Eye Studios या नावाचा अर्थ. Mud (माती) – माती म्हणजे मूळ, आधार, नैसर्गिकता, क्रिएटिव्हिटीचा उगम. Eye (डोळा) – डोळा म्हणजे दृष्टी, दृष्टिकोन, निरीक्षण आणि कला पाहण्याची नजर". अंकिताच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, अंकिता आणि कुणालने फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधली. कुणाल हा पेशाने गायक-संगीतकार आहे.